बीडमध्ये विमा कंपनीचं पितळ उघडं, शेतकऱ्यांचं 100% नुकसान, क्लेम मात्र 15%

बीडमध्ये विमा कंपनीचं पितळ उघडं, शेतकऱ्यांचं 100% नुकसान, क्लेम मात्र 15%

दुष्काळाने होरपळणाऱ्या बीड जिल्ह्यात विमा कंपन्यांची शेतकऱ्यांच्या नावाने नफेखोरी कमावण्याचा घाट घातला आहे. इतिहासातील सर्वाधिक भीषण दुष्काळ पडलेला असताना एकीकडे शेतकऱ्यांचं अर्थचक्र पुरतं बिघडून गेलं असताना दुसरीकडे मात्र पीकविमा ओरियंटल इन्शुरन्स कंपनी मात्र गब्बर झाली आहे.

  • Share this:

सुरेश जाधव (प्रतिनिधी)

बीड, 7 जून- दुष्काळाने होरपळणाऱ्या बीड जिल्ह्यात विमा कंपन्यांची शेतकऱ्यांच्या नावाने नफेखोरी कमावण्याचा घाट घातला आहे. इतिहासातील सर्वाधिक भीषण दुष्काळ पडलेला असताना एकीकडे शेतकऱ्यांचं अर्थचक्र पुरतं बिघडून गेलं असताना दुसरीकडे मात्र पीकविमा ओरियंटल इन्शुरन्स कंपनी मात्र गब्बर झाली आहे. 2018-19 यावर्षासाठी कंपनीला जिल्ह्यातून प्रिमिअम पोटी तब्बल 536 कोटी रुपये मिळाले असून विमा नुकसान भरपाई म्हणून कंपनीने केवळ 346 कोटी रुपये शेतकर्‍यांना दिले आहेत. विमा भरलेल्या 14 लाखांहून अधिक शेतकऱ्यांपैकी केवळ 7 लाख 42 हजार शेतकर्‍यांनाच विमा भरपाई मिळाली आहे. इतर शेतकरी विम्यापासून वंचित आहेत. मग पंतप्रधान पीक विमा योजना नेमकी कोणासाठी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

धारूर तालुक्यातील सदाशिव मारुती मुंडें या शेतकऱ्याने मागच्या वर्षी उदारी उसणवारी करुन पेरणीच्या काळात पत्नी आणि स्वतः च्या नावे दोन हजार रुपये पीकविमा भरला होता. सोयाबीन तूर, तीळ, मूग आणि उडीद असा पिक विमा भरलेली त्यांच्याकडे पावती देखील आहे. मात्र, यादीत नावच आले नाही. कृषी कार्यालयात विचारलं असता इन्शुरन्स कंपनीकडे जा..असे सांगण्यात आले. गेल्या 15 दिवसांपासून या शेतकऱ्याने धारूरच्या कृषी कार्यालयात चकरा मारल्या. शेवटी वैतागून इन्शुरन्स कंपनीचे बीडचे ऑफिस गाठलं. इथे अधिकारी सांगत आहेत. तुमचे पैसे आमच्याकडे आलेच नाही. मग पैसे गेले कुठे..असा प्रश्न सदाशिव यांना पडला आहे. सदाशिव सारखे अनेक गावांतील शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित आहेत.

आंबेजोगाई तालुक्यातील बंडोबा जोगदंड यांनी 1226 रुपये पीक विमा, कापूस, बाजरी, तूर या पिकांना भरला. या वर्षी दुष्काळने काहीच पदरात पडलं नाही. मात्र या शेतकऱ्याला विम्याचा लाभ मिळाला नाही. कृषी अधिकारी उत्तर देत नाहीत म्हणून तीनशे रुपये खर्च करुन जोगदंड बीडच्या इन्शुरन्स कंपनीच्या मुख्य कार्यालयात आलेत. दोन महिने थांबा..तोपर्यंत काही होणार नाही नंतर बघु असे उत्तर..इन्शुरन्स कंपनीचे बीडचे व्यवस्थापक ताकपेरे यांनी दिल्याचे बंडोबा जोगदंड यांनी सांगितले.

पंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकर्‍यांसाठी असल्याचे सांगितले जात असले तरी यातून शेतकर्‍यांचा कमी आणि विमा कंपन्यांचाच जास्त फायदा होत असल्याचे 'news 18 लोकमत'ने समोर आणले आहे. शासन स्तरावर शेतकर्‍यांनी विमा भरावा यासाठी जनजागृती करुन मोठे प्रयत्न केले जातात. प्रीमियम पोटी शेतकर्‍यांसोबतच सरकार देखील विमा कंपनीला निधी देते, मात्र त्याचा पुरेसा परतावा शेतकर्‍यांना मिळत नाही. यावर्षी तीव्र दुष्काळ असताना पीक आलंच नाही. तरी बोगस पीक कापणी प्रयोग दाखवून शेतकऱ्यांसह सरकारची फसवणूक केली जातेय. याबाबतीत इन्शुरन्स कंपनीला विचारलं असता बोलण्यास नकार दिला..तर बेजबाबदारपणे उत्तर दिले. आम्हाला काही माहीत नाही..आम्हाला त्रास देवू नका..अशी उडवाउडवीची उत्तरे दिले जात आहेत.

या प्रकरणी कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे. विशेष म्हणजे कोट्यवधीचा नफा कमावणाऱ्या या कंपनीला कर्मचारी पाहिले तर जिल्हाभरासाठी फक्त चारजण काम पाहतात. सारी यंत्रणा सरकारची अन् फायदा कंपन्यांचा कृषी, महसूल आणि बँक यंत्रणा वापरून फायदा मात्र कंपनीचा असेच धोरण राबवले जात आहे. विम्यासाठी पीक पेरा घ्यायचा तलाठ्यांनी, प्रिमिअम भरून घ्यायचा बँकांनी, लोकांनी विमा भरावास म्हणून महसूल आणि कृषीच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी गावोगाव जागृती करण्याची, बँकांनी रात्रभर जागायचे, पंचनामे कृषी विभागाने करायचे, यात सरकारचे हजारो कर्मचारी मेहनत घेणार आणि एक किंवा दोन एजन्ट जिल्ह्यात असणारी कंपनी शेकडो कोटींचा प्रिमिअम घेणार अशी सारी पद्धत आहे. यातून केवळ कंपन्यांचा गल्ला भरला जात आहे, हे समोर आले आहे. असे शेती अभ्यासक सांगत आहेत.

2018-19 यावर्षासाठी जिल्ह्यातील 14 लाखाहून अधिक शेतकर्‍यांनी 5 लाख 89 हजार हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला होता. यातून विमा कंपनीने तब्ब्ल 540 कोटींचा गल्ला कमावला. यातील 53 कोटी रुपये शेतकर्‍यांनी भरले, तर 486 कोटी रुपये सरकारच्या तिजोरीतून गेले. एवढ्या मोठ्याप्रमाणावर प्रिमिअम भरल्यामुळे तब्बल 2158 कोटीचे विमा संरक्षण घेण्यात आले होते. जिल्ह्यात यावर्षी तीव्र दुष्काळ पडला, कोणतेच पीक शेतकर्‍यांच्या पदरात पडले नाही. मात्र विमा कंपनीने संरक्षित रकमेच्या केवळ 15% रक्कम नुकसान भरपाई म्हणून दिली आहे. सोयाबीनसाठी सर्वाधिक 4 लाख 76 हजार शेतकरी असताना सोयाबीनला विमा भरपाई देण्यातच आली नाही. ज्या पिकांचे दर कमी आहेत अशा तूर, मूग, उडीद, तीळ यासाठी शेतकर्‍यांना काही हजारात रकमा देण्यात आल्या आहेत. मात्र प्रिमिअम पोटी 540 कोटी कमावणार्‍या कंपनीने दिलेली नुकसान भरपाई अवघी 346 कोटींची आहे.

आकडेवारीत आलेख..

-सहभागी शेतकरी - 11 लाख 41 हजार

-संरक्षित क्षेत्र - 5 लाख 89 हजार हेक्टर

-प्रिमिअम- 540 कोटी

-संरक्षित रक्कम - 2158 कोटी

-प्रत्यक्ष भरपाई - 346 कोटी

शिवीगाळ करत स्थानिक आणि परप्रांतीय पुरोहितांच्या दोन गटात तुफान हाणामारी

First published: June 7, 2019, 7:44 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading