मुख्यमंत्री महोदय, हा घ्या पुरावा ; शेती नसतानाही विकली तूर !

मुख्यमंत्री महोदय, हा घ्या पुरावा ; शेती नसतानाही विकली तूर !

"दादाराव मोराडे यांनी 120 क्विंटल तूर विकली पण त्याच्याकडे किती शेती आहे. याची नोंद नाही. मनोहर खौड यांनी 60 क्विंटल तूर विकलीये, शेतीची नोंद नाही"

  • Share this:

प्रफुल्ल खंडारे, शेगाव

01 मे : तुरी खरेदीची व्यवहारात नाफेडचेच अधिकारी उखळ पांढर करुन घेतायत. नाफेडचे संचालकच तूर खरेदीत कसा घोटाळा करतायत. याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट

तूर उत्पादक शेतकऱ्याची ससेहोलपट संपत नाहीये. तूर खरेदीत नाफेडचे अधिकारीच घोटाळा करत असल्याची धक्कादायक माहिती आयबीएन-लोकमतच्या हाती लागलीये.  शेगावमध्ये नाफेडचे संचालक श्रीधर पांडुरंग पाटील यांनी 250 क्विंटल तूर विकली आहे. त्यांच्याकडे फक्त 10 एकर जमीन असतांना त्यांनी 250 क्विंटल तूर विकली. म्हणजे पाटीलसाहेबांना तुरीचं एकरी 25 क्विंटल विक्रमी उत्पन्न झालं असं म्हणावं लागेल.

पण श्रीधर पाटील एकटे नाहीत. दुसरे संचालक निलेश राठी हे त्याच्याही पुढचे, त्यांचे बंधु,जगदीश प्रेमसुख राठी यांच्या नावावर 274 क्विंटल तूर विकल्याची नोंद आहे. तर आई यशोदाबाई प्रेमसुख राठी यांच्या नावावर 150 क्विंटल तूर विकण्यात आलीये. महत्वाच म्हणजे भाऊ आणि आईच्या नावावर दाखवण्य़ात आलेली जमीन एकच आहे. म्हणजे 10 एकरात तुरीच उत्पन्न झालं 400 क्विंटलाच्यावर.

तर आता ही यादी बघा दादाराव मोराडे यांनी 120 क्विंटल तूर विकली पण त्याच्याकडे किती शेती आहे. याची नोंद नाही. मनोहर खौड यांनी 60 क्विंटल तूर विकलीये, शेतीची नोंद नाही.

शिवाजी कराळे यांनी 50 क्विंटल तूर विकली, त्यांच्या शेतीची नोंद नाही. आणि त्यांचाच मुलगा सुरेश शिवाजी कराळेच्या नावावर 50 क्विंटल तूर विकल्याची नोंद आहे. पद्मनाथ कुलकर्णी यांनी 40 क्विंटल तूर विकली शेतीची नोंद नाही. शेतीची नोंद नसतांनाही तूर विकणाऱ्यांची यादी मोठी आहे.

नाफेडचे अधिकारी व्यापारी, नातेवाईक यांची तूर खरेदी करत असतांना, घाम गाळून उत्पन्न घेणारा शेतकरी मात्र अजूनही रांगेत वाट बघतोय.

तुरीची विक्रमी उत्पादन, सरकारी अटी आणि त्यातच नाफेडचे घोटाळेबाज अधिकारी,शेतकरी पुरता भरडला गेलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरावे मागत होते. आता या घोटाळाबाज संचालक आणि व्यापाऱ्यांवर मुख्यमंत्री कारवाई करणार ते बघावं लागेल. ?

तूर घोटाळा

जगदीश प्रेमसुख राठी

निलेश राठींचे बंधू

274 क्विंटल तूर विकली

यशोदाबाई प्रेमसुख राठी

निलेश राठींची आई

150 क्विंटल तूर विकली

 

तूर विकली, शेतीची नोंद नाही

दादाराव मोराडे - 120 क्विंटल तूर विक्री

मनोहर खौड - 60 क्विंटल तूर विक्री

शिवाजी कराळे- 50 क्विंटल तूर विक्री

सुरेश कराळे ( शिवाजी कराळेंचा मुलगा ) - 50 क्विंटल तूर विक्री

पद्मनाथ कुलकर्णी - 40 क्विंटल तूर विक्री

First published: May 1, 2017, 8:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading