समृद्धी महामार्गावर मोजावा लागणार तब्बल १४०० ते ४२०० रुपये टोल !

समृद्धी महामार्गावर मोजावा लागणार तब्बल १४०० ते ४२०० रुपये टोल !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन साकारलेल्या या प्रकल्प पुढे जाण्यात विदर्भातीलच शेतकरी अडसर ठरताहेत. अमरावतीमधील आठ गावांनी या प्रकल्पाला विरोध केलाय.

  • Share this:

प्रवीण मुधोळकर, नागपूर   

09 मे : नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचे काम येत्या १ आॅक्टोबरपासून सुरू होणार असल्याच सरकारनं जाहीर केलंय. एकीकडे या रस्त्यासाठी जमीन अधिग्रहणासाठी अमरावती आणि नाशिकमधील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. तर दुसरीकडे एक दोन दिवसात पंधरा हजार शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहनही सुरू केले जाणार आहे.

विकासापासून दूर असलेल्या विदर्भ आणि मराठवाड्याला राज्याची राजधानी मुंबईशी अवघ्या सहा तासात जोडण्यासाठी नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाची योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखली. हा रस्ता बांधण्यासाठी २८ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे तर या प्रकल्पासाठी ४० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा संपूर्ण खर्च कर्जाद्वारे उभारला जाणार आहे.

हा रस्ता वापरणाऱ्यांना कारचालकांना तब्बल १४०० रुपये टोल मोजावा लागेल तर बस, ट्रक आणि इतर व्यावसायिक वाहनांना ४२०० रुपये टोल आकारला जाईल. तर या रस्त्यावर एकूण तीन ठिकाणं आपातकाळात विमान उतरण्याची सोय असेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन साकारलेल्या या प्रकल्प पुढे जाण्यात विदर्भातीलच शेतकरी अडसर ठरताहेत. अमरावती मधील आठ गावांनी या प्रकल्पाला विरोध केलाय. तर सत्तेतील सहभागी शिवसेनेनही शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल तर विरोधाचा राग अवलंबला जाईल असा इशारा दिलाय.

अमरावतीमधील आठ गावांनी या प्रकल्पांना विरोध केलाय तर नाशिकच्या चार गावांतील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध केलाय.

या प्रकल्पासाठी लागणारी ९७०० हेक्टर जमीन संपादित करतांना सुरुवातीला लँड पुलिंग पद्धत ठरवण्यात आली होती. पण आता शेतकऱ्यांना चार पट मोबदला देऊन रजिस्ट्री करून आधी पैसे अडव्हांस देऊन ही जमीन घेतली जाणार आहे. या प्रकल्पासाठी विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सरकारकडून होतोय पण शेतकऱ्यांसोबतच सहयोगी पक्ष आणि विरोधी पक्षांच्या आक्षेपांचाही सरकारला विचार करावा लागणार आहे.

First published: May 9, 2017, 9:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading