Home /News /maharashtra /

'व्हॉट्सअ‌ॅप चॅट' कारवाईसाठी सक्षम पुरावा होऊ शकत नाही, उज्ज्वल निकम यांचा खुलासा

'व्हॉट्सअ‌ॅप चॅट' कारवाईसाठी सक्षम पुरावा होऊ शकत नाही, उज्ज्वल निकम यांचा खुलासा

बॉलिवूडमधील काही अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअ‌ॅप चॅटवरून ड्रग्ज संदर्भात काही नावे निष्पन्न झाली आहेत.

जळगाव, 24 सप्टेंबर: बॉलिवूडमधील काही अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअ‌ॅप चॅटवरून ड्रग्ज संदर्भात काही नावे निष्पन्न झाली आहेत. मात्र, फक्त व्हॉट्सअ‌ॅप चॅट हा त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी सक्षम पुरावा होऊ शकत नाही, असं मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (special public prosecutor Ujjwal Nikam) यांनी व्यक्त केलं आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (NCB) या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यासाठी आणखी सखोल तपास करावा लागणार आहे, असंही उज्ज्वल निकम यांनी सांगितलं. हेही वाचा...'दीपिका ड्रग्ज घेत असल्यानेच डिप्रेशनमध्ये गेली, NCBला आणखी नावे देण्यात तयार' अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो विभागाकडून तपास सुरू आहे. या तपासादरम्यान रिया चक्रवर्ती हिच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये मिळालेल्या माहितीवरून बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने समन्स बजावले आहे. यामध्ये रकुलप्रीत सिंग, फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा, अभिनेत्री सारा अली खान, अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा समावेश आहे. या विषयावर बोलताना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आपले मत मांडले आहे. ते म्हणाले, की या प्रकरणात अभिनेता किंवा अभिनेत्रींचे मोबाईलवरील व्हॉट्सअ‌ॅप चॅट सक्षम पुरावा ठरणार नाही. या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला सखोल तपास करावा लागणार आहे. संबंधित अभिनेते किंवा अभिनेत्री या कुणाकडून ड्रग्ज घेत होत्या, याच्या मुळापर्यंत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला जावं लागणार आहे. बॉलिवूडमध्ये 'दम मारो दम'; NCBच्या रडारवर 50 सेलिब्रिटीज दुसरीकडे, सुशांत प्रकरणात NCBने रिया चक्रवर्तीची चौकशी केली. या चौकशीदरम्यान सुशांत व ड्रग्जच्या कनेक्शनबरोबरच अनेक सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत. ही नावं ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. एनसीबीने रिया चक्रवर्ती (rhea chakraborty), ड्रग पेडलर्ससह अन्य जणांना अटक केली आहे. सांगितले जात आहे की अमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोच्या (NCB) रडारवर कमीत कमी 50 हून अधिक सेलिब्रिटी आहेत. यामध्ये बड्या निर्मात्यांबरोबरच दिग्दर्शकांचाही समावेश आहे. अमली पदार्थाबाबत तपास करीत असलेल्या एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोनसह श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि अन्य जणांचा चौकशीसाठी समन्स पाठविला आहे. एका अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की पादुकोनला शुक्रवारी चौकशीसाठी बोलाविण्यात आलं आहे. एनसीबीच्या तपासादरम्यान DNSKअशी नावं समोर आली आहे. त्यामुळे आता एनसीबी त्या दिशेनं आपला तपास सुरू आहे. D म्हणजे बॉलिवूडची स्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि K म्हणजे तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश. दीपिकाचे करिश्मासोबत ड्रग्जसंबंधी चॅट समोर आले आहेत. त्यामुळे करिश्मा आणि दीपिका दोघांचीही चौकशी केली जाणार आहे. 25 सप्टेंबरला दीपिकाची चौकशी होणार आहे. हेही वाचा..."IPL मध्येही घेतलं जात ड्रग्ज", अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या दाव्याने खळबळ ड्रग्ज प्रकरणात सारा अली खानचं नावही समोर आलं. सारा एका हाय प्रोफाइल ड्रग पेडलरच्या संपर्कात होती. ज्याचा एनसीबी शोध घेत आहे. सुशांतने सारासह केदारनाथ फिल्ममध्ये काम केलं होतं. रियाने आपल्या जबाबात सांगितलं की, केदारनाथ चित्रपटादरम्यान सुशांत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेत होता. त्यापूर्वीही तो ड्रग्ज घेत होता, मात्र त्यानंतर त्याला ड्रग्जचं व्यसन लागलं होतं.एनसीबीने आता साराला चौकशीसाठी बोलावलं आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या