Home /News /maharashtra /

क्रुझवरील पार्टीत NCP नेत्याच्या मुलाचा जवळचा माणूस होता पण..., फडणवीसांचा दावा

क्रुझवरील पार्टीत NCP नेत्याच्या मुलाचा जवळचा माणूस होता पण..., फडणवीसांचा दावा

'त्याचं नाव आम्ही घेत नाही कारण की, तो क्लीन होता. तो क्लीन असल्यामुळे त्याचं नाव घेऊन त्याला बदनाम करणे अयोग्य आहे'

'त्याचं नाव आम्ही घेत नाही कारण की, तो क्लीन होता. तो क्लीन असल्यामुळे त्याचं नाव घेऊन त्याला बदनाम करणे अयोग्य आहे'

'त्याचं नाव आम्ही घेत नाही कारण की, तो क्लीन होता. तो क्लीन असल्यामुळे त्याचं नाव घेऊन त्याला बदनाम करणे अयोग्य आहे'

नागपूर, 09 ऑक्टोबर : आर्यन खान अटक (aryan khan arrest case) प्रकरणावरून राजकीय आखाडा तापला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी एनसीबीवर (ncb) गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही 'क्रुझवर झालेल्या पार्टीमध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाचा एक जवळचा माणूस होता, पण त्याच्याकडे काहीही सापडले नाही' असा खुलासा केला आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी आर्यन खान अटक प्रकरण, अतिवृष्टी आणि अजित पवार यांच्या नातेवाईकांवर झालेल्या कारवाईवर भाष्य केलं आहे. 'ड्रग ही समाजाला लागलेली कीड आहे. यासाठी कोणती एजन्सी काम करत असेल तर तिच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. हा कोणत्या पक्षाचा प्रश्न नाही, हा समाजाचा आणि तरुणाईचा प्रश्न आहे. याचे राजकारण केले जात आहे. ज्यांना सोडलं त्यामध्ये  NCP च्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाचा एक जवळचा माणूस  होता. त्याचं नाव आम्ही घेत नाही कारण की, तो क्लीन होता. तो क्लीन असल्यामुळे त्याचं नाव घेऊन त्याला बदनाम करणे अयोग्य आहे' असं फडणवीस म्हणाले. Youtube वर VIDEO बघून सर्वात विषारी सापाला गेले पकडायला, नंतर काय झालं पाहा तसंच, NCB ने अगोदरच सांगितले होते की, त्यांनी अनेक लोकांना पकडले होते, त्याच्यातील जे क्लीन होते त्यांना त्यांनी सोडलं आहे. ज्यांच्याकडे काही सापडलं, ज्यांच्या फोनमध्ये काही पुरावे सापडले, chats सापडल्या, त्यांना पकडले' असं म्हणत फडणवीस यांनी एनसीबीची पाठराखण केली. एनडीआरएफचा पैसा आगाऊ हा राज्य सरकारकडे असतो, तो एसडीआरएफकडे असतो. त्यातून राज्याने पैसे द्यावे लागतात. मग सर्व्हे करून केंद्राला मागायचे असतात. मी पण मुख्यमंत्री होतो. इतक्या वेळ थांबायची गरज नाही, असंही फडणवीस म्हणाले. 'आयकर विभागाने ज्या धाडी टाकले आहेत. त्या दोन प्रकारचे आहेत. पहिल्या दिवशी झालेल्या कारवाईबद्दल आयकर विभागाने 1,050 कोटी रुपयांच्या दलालीचे पुरावे सापडल्याचे सांगितले आहे. हे अत्यंत गंभीर आहे. माध्यमांनाही त्याच गांभीर्य अजून कळलेलं नाही. ही 1050 कोटींची दलाली बदल्यांसाठीची आहे, टेंडर साठीची आहे. असे देशात पहिल्यांदाच होत आहे' असंही फडणवीस म्हणाले. 'या' कारणासाठी अभिनेत्रीने अचानक सोडली 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिका 'काल ज्या पाच साखर कारखान्यांवर धाडी टाकण्यात आल्या. त्या कारखान्याच्या खरेदीसाठी राबवण्यात आलेली प्रक्रिया चूक असल्यामुळे ही कारवाई झाली. साखर कारखाना खरेदी करताना तुम्ही तो लाचेच्या किंवा काळ्या पैशाने त्याबद्दल फक्त टॅक्स भरून तो पांढरा पैसा आहे असं भासवून खरेदी करू शकत नाही. कारखाना खरेदी करताना तो योग्य पैशानेच खरेदी करावा लागतो. मात्र, या पाचही प्रकरणात तसं झालं नव्हतं. त्या प्रकारच्या तक्रारी होत्या आणि त्यानंतरच आयकर विभागाने कारवाई केली आहे, असं म्हणत फडणवीस यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. 'पवार कुटुंबामध्ये इतर अनेक लोक आहेत, ते त्यांचे व्यवसाय करत आहेत, त्यांच्याविरोधात कारवाई झालेली नाही. त्यामुळे आयकर विभागाच्या कारवाई पवार कुटुंबीयांच्या विरोधात आहे असं म्हणणं चुकीचं आहे' असा टोलाही फडणवीसांनी लगावला.
Published by:sachin Salve
First published:

Tags: देवेंद्र फडणवीस

पुढील बातम्या