क्रूरतेचा कळस! नाशिकमध्ये गतिमंद मुलीवर चौघांनी केला रात्रभर बलात्कार

क्रूरतेचा कळस! नाशिकमध्ये गतिमंद मुलीवर चौघांनी केला रात्रभर बलात्कार

सकाळी बहिणीने तिला रात्रभर कुठे होती याबाबत विचारले असता तिने हात इशाऱ्याने घडलेला प्रसंग सांगण्याचा प्रयत्न केला.

  • Share this:

नाशिक,22 डिसेंबर: देशात हैदराबाद, उन्नाव येथील महिलांवरील अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असताना नाशिक जिल्ह्यात क्रूरतेने कळस गाठला आहे. गतिमंद मुलीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आदिवासी भागातील सुरगाणा येथे 19 वर्षीय गतिमंद मुलीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार खुटविहिर गावात उघडकीस आला. सुरगाणा पोलिसांनी चारही नराधमांना अटक केली आहे. दीपक काशीराम पवार, दीपक आनंद पवार, सुरेश शिवराम शेवरे आणि अशोक उणाजी गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलीच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी मध्यरात्री संशयित आरोपींनी मुलीस फसू लावून गावातील निर्जन स्थळी शेतावर नेले. येथे तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. रात्रभर संशयित तिच्यावर अत्याचार करत होते. सकाळी बहिणीने तिला रात्रभर कुठे होती याबाबत विचारले असता तिने हात इशाऱ्याने घडलेला प्रसंग सांगण्याचा प्रयत्न केला. बहिणीला संशय आल्यानंतर तिने बहिणीला पाहिले असता तिच्यावर पाशवी व अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे समजले. बहिणीला घेऊन तिने पोलिस ठाण्यात धाव घेतली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संशयितांचा शोध घेत त्यांना मोहपाडा, मालगोंदा, भाकुर्डी येथे अटक केली. दरम्यान, यापूर्वी आरोपींनी इतर कुणावर अत्यचार केले का याचा तपास पोलिस करत आहेत.

First published: December 22, 2019, 9:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading