मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

संजय राऊत तुरुंगात, खुर्ची मेळाव्यात, शिवसेनेच्या कार्यक्रमात स्पेशल जागा

संजय राऊत तुरुंगात, खुर्ची मेळाव्यात, शिवसेनेच्या कार्यक्रमात स्पेशल जागा

शिवसेनेच्या मेळाव्यात संजय राऊतांसाठी खूर्ची

शिवसेनेच्या मेळाव्यात संजय राऊतांसाठी खूर्ची

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा बोलावला आहे. शिवसेनेच्या या मेळाव्यासाठी व्यासपीठावर वेगळी खूर्ची ठेवण्यात आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 21 सप्टेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा बोलावला आहे. शिवसेनेच्या या मेळाव्यासाठी व्यासपीठावर वेगळी खूर्ची ठेवण्यात आली आहे. शिवसेना नेते अनंत गिते आणि भास्कर जाधव यांच्या मध्ये संजय राऊत यांची खूर्ची ठेवण्यात आली आहे. संजय राऊत हे सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना अटक केली आहे. या प्रकरणी ईडीने संजय राऊत यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे.

शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी कानमंत्र देणार आहेत. बूथ जिंका मुंबई जिंका, असा नवीन मंत्र उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना देणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.

मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंची ही रणनीती भाजपसारखीच म्हणावी लागेल. भाजपनेही 2014 पासून पन्ना प्रमुख आणि बूथ प्रमुख नेमून या प्रमुखांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. भाजपच्या या रणनितीचा फायदा त्यांना मोठ्या प्रमाणावर झाला. उद्धव ठाकरे यांनीही अशाचप्रकारे बूथ जिंका, निवडणूक जिंका, अशी रणनीती अवलंबली आहे.

दुसरीकडे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत उद्धव ठाकरे आज काय बोलणार, याकडे शिवसैनिकांचं लक्ष असेल. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घ्यायला मुंबई महापालिकेने अजूनही ठाकरेंना परवानगी दिलेली नाही. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी मिळावी, यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली आहे.

First published:

Tags: Sanjay raut, Shivsena, Uddhav Thackeray