वर्ष उलटले तरीही सोयाबीन शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही

वर्ष उलटले तरीही सोयाबीन शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही

शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता प्रती क्विंटल २०० रुपये मदत सरकारने जाहीर केली होती. या घोषणेला एक वर्ष होतंय. त्यामुळे सरकारची ही घोषणाही हवेत विरण्याचं चित्र आहे.

  • Share this:

वाशिम,27 ऑक्टोबर: गेल्या वर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता प्रती क्विंटल २०० रुपये मदत सरकारने जाहीर केली होती. या घोषणेला एक वर्ष होतंय. त्यामुळे सरकारची ही घोषणाही हवेत विरण्याचं चित्र आहे.

एक वर्ष होऊनही या अनुदानाचा एकही पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाहीय. हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी दत्तराव मगर आणि विश्वनाथ गायकवाड यांनी गेल्या वर्षी वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन विकलं आहे. सोयाबीन विक्रीनंतर सरकारने शेतकऱ्यांना अनुदान म्हणून २०० रुपये प्रती क्विंटल देण्याची घोषणा केली. त्यासाठी काही कागदपत्रांसह अर्ज करण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांनी पारही केलीये. पण अजूनही अनुदान काही मिळालेलं नाही. जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समिती मधील 44618 पात्र शेतकऱ्यांनी एकूण 7,39,567.97 क्विंटल सोयाबीन विक्री केली त्या करिता सरकार कडून 14,79,93,594 रुपये शेतकऱ्याला देणे बाकी आहे मात्र अनुदान द्यायचे नव्हते तर घोषणा आणि अर्ज का मागवले असा प्रश्न शेतकरी करत आहेत.

सरकारने सोयाबीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्याला या सर्व प्रक्रीयेसाठी अटी व शर्ती ठेवल्या होत्या. त्या शेतकऱ्यांनी पूर्ण करून हि शेतकऱ्यांकडून मदत मिळत नसल्याने नेमके हे सरकार मदतीच घोषणा करून मदतीच्या नावा खाली चेष्टा करत असल्याची भावना आता शेतकरी व्यक्त करत आहेत.

First published: October 27, 2017, 8:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading