Home /News /maharashtra /

Omicron मुळे दक्षिण भारतातील प्रसिद्ध खंडोबाची माळेगाव यात्रा रद्द

Omicron मुळे दक्षिण भारतातील प्रसिद्ध खंडोबाची माळेगाव यात्रा रद्द

दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रा रद्द

दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रा रद्द

Malegaon Khandoba Yatra canceled: या यात्रेला इतर ठिकाणांहून मोठ्या संख्येने भाविक आणि व्यापारी येत असतात. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कता म्हणून यंदा देखील माळेगाव यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

नांदेड, 17 डिसेंबर : दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेली नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रा (Nanded Malegaon Yatra) रद्द करण्यात आली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या (Omicron variant of Coronavirus) पार्श्वभूमीवर तसेच नांदेड जिल्ह्यात कमी लसीकरण झाल्याने यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात्रा रद्द करण्यात आली असली तरी खंडोबाची मुख्य पूजा आणि इतर धार्मिक कार्यक्रम (Khandoba pooja and other rituals will take place) पार पडणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथे श्री क्षेत्र खंडोबाचे मंदिर (Shre Kshetra Khandoba Temple Malegaon) आहे. दरवर्षी डिसेंबर अखेरीस इथे मोठी यात्रा भरते. विविध राज्यातून या यात्रेत व्यापारी सहभागी होतात. 5 दिवस चालणाऱ्या या यात्रेत लाखो भाविक सामील होत असतात. पण कोरोनामुळे सलग 2 वर्ष ही यात्रा रद्द करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. मात्र लसीकरनात नांदेड जिल्हा अजून मागे आहे. आतापर्यंत जिल्ह्यात पहिला डोस 72% तर दुसरा डोस फक्त 32% लोकांनी घेतला आहे. मागील महिन्यात झालेल्या जिल्हा पतिषदेच्या सर्व साधारण सभेत माळेगाव यात्रे संदर्भात जोरदार चर्चा झाली होती. यंदा कोविड नियमांचे पालन करत यात्रा भरवावीअसा काही सदस्याचा आग्रह होता. त्यानुसार डिसेंबर महिन्याच्या शेवटी यात्रेचे नियोजन करण्यात आले होते. पण ओमायक्रोनचा एक रुग्ण बाजूच्या लातूर जिल्ह्यात आढळला. माळेगाव हे गाव लातूर जिल्ह्याच्या सीमेवरच आहे. वाचा : देशभरात झपाट्यानं प्रसार; महाराष्ट्र ओमायक्रॉनचा Hotspot, रुग्णांचा आकडा 88 वर या यात्रेला लातूरहुन देखील मोठ्या संख्येने भाविक आणि व्यापारी येत असतात. या पार्श्वभूमीवर  प्रशासनाने सतर्कता म्हणून यंदा देखील माळेगाव यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. माळेगावच्या यात्रेला राजश्रय देखील आहे. माळेगावचा खंडोबाराया काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे कुल दैवत आहेत. हयात असतांना विलासराव देशमुख दरवर्षी यात्रेला येत असतं. आता ही दरवर्षी विलासराव यांचे सुपुत्र धीरज देशमुख यात्रेला येतात. बुलडाण्यापाठोपाठ उस्मानाबादेत omicron ची एन्ट्री कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या राज्यात वाढत चालली आहे. मुंबई, पुण्यापाठोपाठ आता विदर्भ, मराठवाड्यात ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. बुलडाण्यापाठोपाठ आता उस्मानाबादमध्येही 15 डिसेंबर रोजी दोन रुग्ण आढळून आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. युएईहुन बावी येथे आलेला रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे बावीत कलम 144 लागू करण्यात आले आहे. शारजा, युएई (संयुक्त अरब अमिरात) हुन उस्मानाबाद जिल्ह्यात आलेला 42 वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. पण त्याच्या संपर्कात आलेल्या रुग्णाचा ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Sunil Desale
First published:

Tags: Coronavirus, Nanded

पुढील बातम्या