मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, मुख्यमंत्र्यांनी केली 'त्या' फाईलवर स्वाक्षरी, आता होणार कारवाई

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, मुख्यमंत्र्यांनी केली 'त्या' फाईलवर स्वाक्षरी, आता होणार कारवाई

परमबीर सिंग यांच्यावर पाच वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल असून त्यांचा तपास सुरू आहे.

मुंबई, 02 डिसेंबर: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (former Mumbai Police Commissioner Parambir Singh) यांच्या निलंबनाच्या फाईलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या संदर्भात आज गृहविभाग आदेश जाहीर करतील अशीही माहिती समोर येतेय. परमबीर सिंग यांच्यावर पाच वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल असून त्यांचा तपास सुरू आहे.

तसेच त्यांनी 200 दिवसांहून अधिक दिवस गृह विभागाला न कळवता परस्पर सुट्टी घेतली होती. त्या संदर्भातही शिस्तभंगाची कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मिळतेय. आता निलंबन करण्यात आलंय याच्या पुढची कारवाई थेट सेवेतून बडतर्फ असणार आहे.

ड्युटीवर नसतानाही परमबीर सिंग यांच्याकडून सरकारी गाडीचा वापर

परमबीर सिंग हे अचानक गायब झाले आणि अखेर 234 दिवसांनी ते मुंबईत परतले. मुंबईत परतले परमबीर सिंग हे ड्युटीवर अद्यापही हजर नाहीयेत आणि असे असतानाही ते सरकारी गाडीचाच वापर करत आहेत. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारले असता त्यांनी यावर चौकशीचे आदेश दिल्याचं म्हटलं आहे. (Dilip Walase Patil on Parambir Singh using official car)

हेही वाचा- IND vs NZ: न्यूझीलंडला हरवण्यासाठी टीम इंडियात होणार 3 बदल, पाहा कशी असेल Playing11

दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं, परमबीर सिंग यांनी आपला पदभार स्वीकारलेला नाहीये. ज्या प्रकारे ते गाडीचा वापर करत आहेत ते चुकीचं आहे. ते कामावर नाहीत त्यांच्याबर गंभीर आरोप आहेत. तरीदेखील ते गाडी वापरत आहेत. सरकारी यंत्रणांचा वापर त्यांनी केला नाही पाहिजे. हे चुकीचं आहे चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी अद्याप आपला पदभार स्वीकारलेला नाहीये.

नेमकं प्रकरण काय?

परमबीर सिंग यांच्या आरोपांची शहानिशा आणि चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने सेवानिवृत्त न्यायाधीश के यू चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगाने परमबीर यांना चौकशीसाठी अनेकदा समन्स बजावले होते. चांदिवाल आयोगाने समन्स बजावल्यानंतर परमबीर सिंग अचानक गायब झाले होते. ते अनेकदा समन्स बजावूनही चौकशीला हजर राहिले नव्हते. त्यामुळे या प्रकरणी मुंबईच्या किला कोर्टात झालेल्या सुनावणीत परमबीर यांना फरार घोषित करण्यात आले. तर दुसरीकडे परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात अटकपूर्व जामीनसाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर पुढील सुनावणी 6 डिसेंबरला होणार आहे. पण तोपर्यंत अटक न करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे परमबीर यांना 6 डिसेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळालं आहे.

परमबीर सिंग - सचिन वाझे भेट

दरम्यान, परमबीर काल (29 नोव्हेंबर) चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. यावेळी चांदीवाल आयोगाने त्यांचे जामीनपात्र वॉरंट रद्द केलं. तसेच मुख्यमंत्री सहायत्ता निधीत 15 हजार रुपये भरण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे चांदीवाल आयोग सुनावणीसाठी आज सचिन वाझे याचीदेखील नियमित तारीख होती. त्यामुळे परमबीर सिंग चांदीवाल आयोगाच्या समोर जाण्याआधी समन्स रुममध्ये त्यांची सचिन वाझेसोबत भेट झाली. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्यासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी आणि व्यापारी मन्सुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझे हा अटकेत आहे. या प्रकरणीच्या सुनावणीसाठी वाझेची आज नियमित तारीख होती. पण या दरम्यान परमबीर सिंग आणि वाझे यांच्यात भेट झाली. या भेटीवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. या भेटीवर अनिल देशमुख यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे.

First published:

Tags: Uddhav Thackeray (Politician)