मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नांदेडमध्ये भूगर्भातील गूढ आवाजामुळे ग्रामस्थ भयभीत, 15 दिवसांपूर्वी जाणवले होते भूकंपाचे धक्के

नांदेडमध्ये भूगर्भातील गूढ आवाजामुळे ग्रामस्थ भयभीत, 15 दिवसांपूर्वी जाणवले होते भूकंपाचे धक्के

Nanded News: कामाजीवाडी आणि हानेगाव या दोन गावात गेल्या काही दिवसांपासून जमिनीतून आवाज येत आहेत. यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

Nanded News: कामाजीवाडी आणि हानेगाव या दोन गावात गेल्या काही दिवसांपासून जमिनीतून आवाज येत आहेत. यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

Nanded News: कामाजीवाडी आणि हानेगाव या दोन गावात गेल्या काही दिवसांपासून जमिनीतून आवाज येत आहेत. यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

नांदेड, 14 डिसेंबर : नांदेड जिल्ह्यातील देगलूर (Deglur Nanded) या तालुक्यातल्या कामाजीवाडी गावात सध्या भूगर्भातून गूढ आवाज येत आहेत. जमिनीतून येणाऱ्या आवाजामुळे कामाजीवाडी गावातील गावकरी भयभीत झाले आहेत. महाराष्ट्र- कर्नाटक राज्याच्या सीमेवर कामाजीवाडी (Kamajiwadi) आणि हानेगाव (Hanegaon) या दोन गावात गेल्या काही दिवसांपासून जमिनीतून आवाज येत आहेत. सोमवारी दोन ते तीन वेळा जमिनीतून मोठे आवाज आले. आवाजाला घाबरून नागरिक घराबाहेर पडले.

भूकंपाच्या भीतीने गावकऱ्यांनी संपूर्ण रात्र जागून काढली. जमिनीतून आवाज का येत आहेत. याची तपासणी करावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे. हानेगावमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. यापूर्वी 26 नोव्हेंबर रोजी कामाजीवाडी येथे भूकंपाचे सौम्य धक्के जावणले होते. 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजून 58 मिनिटाला भूकंपाचा धक्का बसला होता. त्या धक्क्याची तीव्रता 1.5 रिश्टर स्केल इतकी होती.

वाचा : "पेपर फोडणारे अद्याप फुटले नाहीत म्हणून पेपर सारखे फुटतात"

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भूमापक यंत्रावर ही नोंद झाली होती . तेव्हा पासून नागरिक भयभीत आहेत. दरम्यान काही वर्षांपूर्वी नांदेड शहरातील श्रीनगर, भाग्य नगर, पोलीस कॉलनी भागात देखील अशाच पद्धतीने भूगर्भातून आवाज येत होते. अनेक तज्ञांनी त्याचा अभ्यास केला मात्र कोणताच निष्कर्ष निघाला नाही. कामाजीवाडी आणि हानेगावात देखील अनेक वेळा जमिनीतून आवाज येत आहेत.

भूकंप येईल अशी नागरिकांना भीती आहे. यापूर्वी जेव्हा भूकंपाचे धक्के जाणवले त्यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावात जाऊन भेट दिली होती. लोकांशी संवाद साधला होता. त्यावेळी नेणका भूकंप का झाला याबाबत मात्र अजून प्रशासनाकडून माहिती देण्यात आली नाही. आता जमिनीतून आवाज येत असल्याने नागरिक रात्री घरात झोपन्यास घाबरत आहेत. रात्रीतून भूकंप होईल अशी नागरिकांना भीती आहे. सध्या थंडीचे दिवस असल्याने रात्री थंडीत लोकांना झोपावं लागत आहे.

बीडमध्ये जमिनीतून आला मोठा आवाज

तिवृष्टीच्या आणि मुसळधार पावसाच्या (beed rain) अस्मानी संकटानंतर ऑक्टोबर महिन्यात बीडमधील (beed) पिंपळ टक्का या डोंगरातील गावात भूगर्भातील गूढ आवाजामुळे नागरिक हैराण झाले. भूकंपाच्या भीतीने संपूर्ण गाव रात्र जागून काढत आहेत. लहान मुलांसह वयोवृद्ध माणसं देखील घरात भेदरलेल्या अवस्थेत राहत आहेत. भूगर्भातील हालचालीमुळे असे आवाज होऊ शकतात, असं भूगर्भ तज्ञ यांनी अंदाज व्यक्त केला आहे. मात्र आवाजचं खरं कारण अद्याप समोर आलं नाही.

First published:

Tags: Earthquake, Nanded