महाराष्ट्रात उद्या बहुमत चाचणी : सोनिया गांधी यांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्रात उद्या बहुमत चाचणी : सोनिया गांधी यांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर एवढे दिवस कुठलीही थेट प्रतिक्रिया न देणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यावर पहिल्यांदाच बोलल्या आहेत. महाराष्ट्रातली बहुमत चाचणी जिंकणार का यावर सोनिया काय म्हणाल्यात वाचा...

  • Share this:

मुंबई, 26 नोव्हेंबर : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेबद्दल महत्त्वाचा निर्णय दिल्यानंतर आता फडणवीस सरकारला उद्या 5 वाजायच्या आत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. फ्लोर टेस्टमध्ये काय होणार याबाबत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया आली. पण याबाबतीत एवढे दिवस कुठलीही थेट प्रतिक्रिया न देणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यावर पहिल्यांदाच बोलल्या आहेत. महाराष्ट्रातली बहुमत चाचणी जिंकणार का यावर सोनिया गांधी यांनी Absolutely असं एका शब्दात पण निसंदिग्ध उत्तर दिलं.

काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी आमदारांच्या बैठकीत ही घोषणा केली. बहुमत चाचणी (फ्लोअर टेस्ट) आधी हॉटेल जे डब्ल्यु मेरियटमध्ये काँग्रेस आमदारांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या गटनेत्यांची निवड करण्यात आली आहे. पुढील 24 तासांत नेमके काय करायचे याबाबत खर्गे यांनी आमदारांना सूचना दिल्या.

सुप्रीम कोर्टाच निर्णय आल्यानंतर आता विधानभवनातल्या हालचालींना वेग आला आहे. अजित पवार काय निर्णय घेतात, व्हीप काढतात की, राजीनामा देतात यावर फडणवीस सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढल्याचं दिसतं. आमच्याकडे बहुमत आहे, असं संजय राऊत यांनी सकाळीच स्पष्ट केलं. पण तरीही राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांची समजून काढण्याचा शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली पण अद्याप पदभार स्वीकारलेला नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

वाचा - अजित पवारांचं बंड उधळून लावण्यासाठी शरद पवारांनी टाकलं पाऊल, खलबतं सुरू

या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनीसुद्धा आमचीच आघाडी बहुमत चाचणी जिंकणार आणि फडणवीस सरकार पडणार अशी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोफिटेल हॉटेलला दाखल झाले आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केलेलं असताना उद्या विद्यमान सरकारची बहुमत चाचणी होत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या बंडाचा फटका बसू नये म्हणून स्वत: शरद पवार मैदानात उतरले आहेत.

वाचा - 53 आमदारांचा पाठिंबा असूनही पवार कुटुंबीय अजित पवारांची मनधरणी का करतंय?

शरद पवार हे सध्या राष्ट्रवादीच्या फुटीर 13 आमदारांसोबत बैठक घेत आहेत. उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर या आमदारांना सुरक्षित ठेवण्यात आलं आहे. फुटीर आमदारांसोबत शरद पवार स्वतः चर्चा करत आहेत. त्यामुळे उद्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी फडणवीस सरकारला मदत न केल्यास अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का असू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 26, 2019 01:03 PM IST

ताज्या बातम्या