मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

SSC Result: मुलीनं मिळवले 96 टक्के; धुणीभांडी करणाऱ्या आईच्या कष्टाचं झालं चीज

SSC Result: मुलीनं मिळवले 96 टक्के; धुणीभांडी करणाऱ्या आईच्या कष्टाचं झालं चीज

सोलापुरातील चैत्रा पुना नाका येथील माशाळ वस्ती म्हणजे अठराविश्व दारिद्र्य भोगणारी नागरी वस्ती...

सोलापुरातील चैत्रा पुना नाका येथील माशाळ वस्ती म्हणजे अठराविश्व दारिद्र्य भोगणारी नागरी वस्ती...

सोलापुरातील चैत्रा पुना नाका येथील माशाळ वस्ती म्हणजे अठराविश्व दारिद्र्य भोगणारी नागरी वस्ती...

सोलापूर, 30 जुलै: कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर सोलापुरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या सोनालीने दहावीत चक्क 96 टक्के गुण मिळवले आहेत. सोनाली हिनं धुणीभांडी करणाऱ्या आईच्या कष्टाचं चीज केलं आहे. सोलापुरातील चैत्रा पुना नाका येथील माशाळ वस्ती म्हणजे अठराविश्व दारिद्र्य भोगणारी नागरी वस्ती. या वस्तीत शिक्षण घेणारे तसे विरळाच. मात्र याच झोपडपट्टीत राहणाऱ्या सोनाली मोरे या तरुणीने महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परिक्षेत तब्बल 96 टक्के गुण संपादन करुन माशाळ वस्तीची ओळख पुसण्याचा प्रयत्न केला आहे. हेही वाचा...SSC Result: पेट्रोल पंपावर काम करणाऱ्याच्या मुलीनं करून दाखवलं, मिळवले 97 टक्के गुण सोनालीला इयत्ता नववीपर्यंत कोणतीही ट्यूशन नव्हती. स्वाध्याय करुनच तिची आजवरची वाटचाल झाली. केवळ दहावीला प्रवेश घेतल्यावरच तिने खासगी ट्यूशनला प्रवेश घेतला. त्याबळावरच तिने शरदचंद्र पवार प्रशालेत प्रथम क्रमांक मिळवत 96 टक्के गुण संपादन केले आहेत. खरंतर अवघ्या 2 वर्षाची असतानाच सोनालीचे पितृछत्र हरपलं. मात्र, आई दैवशीला मोरे यांनी चार घरची धुणीभांडी करुन आपल्या मुलीला शिकवलं. मुलीच्या शिक्षणासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असल्याचे त्या सांगतात. सोनालीने केवळ शिक्षणातच यश संपादन केलेय असे नाही तर पुरुषी वर्चस्व असलेल्या ज्युदो, कराटे मध्ये श्रीलंकेत जाऊन गोल्ड मेडल मिळवले आहे. त्याचबरोबर वकृत्व स्पर्धेतही तिने प्राविण्य मिळवले आहे. हेही वाचा... 'एलिझाबेथ एकादशी'मधल्या झेंडूला गणितात मिळाले चक्क 100 पैकी 42 नव्हे 96 गुण माशाळ वस्ती झोपडपट्टीत 96 टक्के मिळवणारी सोनाली ही पहिलीच विद्यार्थिनी आहे. त्यामुळे झोपडपट्टीसह सोलापूर शहरातून सोनालीचे मोठे कौतुक होत आहे. सोनालीला भविष्यात डॉक्टर व्हायचे आहे. मात्र पत्र्याच्या घरात राहून आणि चार घरचे धुनी भांडी करुन तिचे हे स्वप्न पूर्ण होईलच असे नाही. त्यासाठी गरज आहे ती समाजातील दात्यांनी पुढे येऊन तिला मदत करण्याची असल्याचं सोनालीनं सांगितलं. सोनालीने मिळवलेले यश हे तिचे एकटीचे नसून यामध्ये तिच्या आईसह शिक्षकांचे योगदानही मोलाचे आहे. मात्र असे असले तरी सोनालीने ज्या वातावरणात हे यश मिळवलेय ते मात्र अद्वितीय असेच आहे.
First published:

Tags: Solapur news

पुढील बातम्या