Elec-widget

सोनई ऑनर किलिंग, प्रेमसंबंधांतून तिघांची निर्घृण हत्या, दोषींची फाशी कायम

सोनई ऑनर किलिंग, प्रेमसंबंधांतून तिघांची निर्घृण हत्या, दोषींची फाशी कायम

सेप्टिक टँक साफ करण्याच्या बहाण्याने बोलावून केली होती तिन्ही तरुणांची निर्घृण हत्या...

  • Share this:

मुंबई,2 डिसेंबर:अहमनगर जिल्ह्यातील बहुचर्चित सोनई 'ऑनर किलिंग'प्रकरणी सहापैकी पाच जणांची फाशीची शिक्षा मुंबई हायकोर्टाने कायम ठेवली आहे. आरोपी अशोक नवगिरे याची हायकोर्टाकडून पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. जानेवारी 2013 मध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणातून तीन तरुणांची निर्घृण हत्या झाली होती.आरोपी असलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांसह त्यांचा एक साथीदार अशा सहा दोषींना नाशिकच्या सेशन कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. हायकोर्टाने आता ही शिक्षा कायम ठेवली आहे.

'हा गुन्हा दोन कुटुंबांतील वादातून नाही, तर जातीय मानसिकतेतून झालेला दुर्मिळातील दुर्मिळ असल्याने तुम्हाला जिवंत सोडणे, हे समाजाच्या दृष्टीने धोकादायक असल्याने, तीन निष्पाप तरुणांची निर्घृण, निर्दय आणि क्रूर हत्या केल्याबद्दल तुम्हाला मरेपर्यंत फाशी, सात वर्षांची सक्तमजुरी आणि प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे,' असा निकाल नाशिकच्या सेशन कोर्टाचे जज आर. आर. वैष्णव यांनी दिला होता. आरोपींकडून वसूल केल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेतून पीडितांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश त्यांनी सरकारी पक्षाला दिले होते.

आंतरजातीय प्रेमसंबंधांच्या झाली होती हत्या..

सोनई गावात 1 जानेवारी 2013 रोजी आंतरजातीय प्रेमसंबंधांच्या रागातून दरंदले या सवर्ण कुटुंबातील मुलीचे वडील पोपट, भाऊ गणेश, काका रमेश व प्रकाश, आतेभाऊ संदीप कुरे आणि त्यांचा साथीदार अशोक नवगिरे यांनी सेप्टिक टँक साफ करण्याच्या बहाण्याने बोलावून सचिन घारू, राहुल कंडारे व संदीप थनवार या सफाई कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या केली होती.

अशी केली तिन्ही तरुणांची निर्घृण हत्या..

Loading...

- सचिन हा मागास असल्याने त्याच्यासोबतचे प्रेमसंबंध मान्य नसल्याने दरंदले कुटुंबीयांनी या तिघांची हत्या केली.

- घटनेच्या सकाळी 10 ते दुपारी 3.30 या दरम्यान तिन्ही मृत दरंदलेच्या घरी असल्याचे सिद्ध झाले आहे.

- पंधरा दिवसांपूर्वी सवर्ण दरंदले कुटुंबाने अनुसूचित जातीच्या सचिनला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे सिद्ध झाले.

- मृत सचिनने सवर्ण मुलीशी लग्न करण्याचा निश्चय व्यक्त केला होता.

- लग्नाला विरोध असल्याने दरंदलेंनी सचिनला मारण्याचा कट रचला. नवगिरेमार्फत सचिनच्या मित्रांना बोलावणे पाठवले.

- नवगिरेने संदीप आणि राहुलसह सचिनला दरंदले वस्तीवर संडासची टाकी साफ करण्यासाठी नेले.

- संदीपचे प्रेत संडासच्या टाकीत सापडल्याची खोटी माहिती पोपट आणि प्रकाश दरंदले यांनी सोनई पोलिसांना देऊन खोटा पुरावा तयार केला.

- अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने थंड डोक्याने आणि क्रूर पद्धतीने हे तिन्ही खून केल्याचे परिस्थितिजन्य पुराव्यांतून न्यायालयात सिद्ध झाले आहे.

- सवर्ण मुलगी फितूर झाली असली तरी 2 जानेवारीस घरी प्रॉब्लेम झाल्याने ती कॉलेजला न गेल्याची साक्ष पुढे आली आहे. कॉलेजला न जाण्याचे कारण तिला कोर्टात सांगता आले नाही.

- सर्व आरोपींचा सचिनवर प्रचंड राग असल्याने त्यांनी त्याच्या शरीराचे आठ तुकडे करून बोअरमध्ये लपवले, शीर कापून विहिरीत टाकले.

- प्रत्यक्षदर्शी राहुलच्या डोक्यात घाव घालून, तर संदीपला टाकीत उलटे लटकावे नंतर रोपींनी त्यांची हत्या केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2019 04:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com