मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुलाच्या शैक्षणिक खर्चानं घेतली बापाची परीक्षा; अकोल्यात शिक्षक पित्याचा हृदयद्रावक शेवट

मुलाच्या शैक्षणिक खर्चानं घेतली बापाची परीक्षा; अकोल्यात शिक्षक पित्याचा हृदयद्रावक शेवट

मिलिंद नामदेव शिरसाट असं आत्महत्या करणाऱ्या 45 वर्षीय शिक्षकाचं नाव आहे. (File Photo)

मिलिंद नामदेव शिरसाट असं आत्महत्या करणाऱ्या 45 वर्षीय शिक्षकाचं नाव आहे. (File Photo)

Suicide in Akola: अकोला जिल्ह्यातील बाळापूर याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका शिक्षक पित्याने आपल्या आयुष्याचा हृदयद्रावक शेवट केला आहे.

  • Published by:  News18 Desk

बाळापूर, 04 ऑक्टोबर: अकोला जिल्ह्यातील बाळापूर याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका शिक्षक पित्याने आपल्या आयुष्याचा हृदयद्रावक शेवट केला आहे. परदेशात शिकायला जाणाऱ्या मुलाचा शैक्षणिक खर्च कसा भागवायचा या विवंचनेतून शिक्षक पित्याने गळफास घेत आत्महत्या (Teacher commits suicide) केली आहे. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मिलिंद नामदेव शिरसाट असं आत्महत्या करणाऱ्या 45 वर्षीय शिक्षकाचं नाव आहे. मृत शिरसाट हे मूळचे अकोला जिल्ह्यातील माणकी येथील रहिवासी असून ते शेळद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. तर त्यांचा मुलगा सम्यक हा शिक्षणासाठी रशियात जाणार होता. सम्यक हा शिक्षणात हुशार असल्यानं त्याला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी शिरसाट नेहमीच प्रयत्नशील असायचे.

हेही वाचा-बापाच्या कृत्याची चिमुकल्याला मिळाली शिक्षा; अखेर कृष्णा नदीत सापडला मृतदेह

दरम्यान शिरसाट यांचा मुलगा सम्यक हा वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी रशियात जाणार होता. यामुळे शिक्षक वडील मिलिंद शिरसाट खूप आनंदात होते. पण विदेशात शिकायचं म्हटल्यावर जास्त खर्च होणार, याची चिंता त्यांना सतावत होती. येत्या दोन तीन दिवसांत मुलगा विदेशात शिक्षणासाठी जाणार होता. याची सर्व तयारी देखील झाली होती. दोन दिवसांपूर्वी मिलिंद यांनी अॅडमिशन फीसाठी दहा लाख रुपये जमा देखील केले होते. दोन-तीन दिवसांत मुलगा विदेशात जाणार म्हणून शिरसाट आणखी काही पैसे जमा करण्यासाठी धडपडत होते.

हेही वाचा-आईवडिल घोरत होते, बाळ गुदमरत होतं! नवजात बालकाच्या दुर्दैवी मृत्यूची करूण कहाणी

या विवंचनेतून मिलिंद शिरसाट यांनी व्याळा नांदखेड मार्गावरील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना उघडकीस येताच शिरसाट कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. एकीकडे मुलगा विदेशात शिक्षणासाठी जाणार आणि दुसरीकडे त्याच्याच वडिलांचं दुर्दैवी निधन यामुळे शिरसाट कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी राहुल श्रीराम इंगळे यांच्या फिर्यादीवरून बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Akola, Suicide