मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वडिलांच्या उपचारासाठी मुलाचं गुन्हेगारी पाऊल; मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारला पण एका तासातच...

वडिलांच्या उपचारासाठी मुलाचं गुन्हेगारी पाऊल; मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारला पण एका तासातच...

चोरट्यानं मंदिरातील सीसीटीव्हीला पेंट फासून दानपेटीवर डल्ला मारला आहे. (PC-सामना)

चोरट्यानं मंदिरातील सीसीटीव्हीला पेंट फासून दानपेटीवर डल्ला मारला आहे. (PC-सामना)

Crime in Chandrapur:चंद्रपूरातील संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थानातील दानपेटी फोडल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यानं मंदिरातील सीसीटीव्हीला पेंट फासून दानपेटीवर डल्ला मारला आहे.

  • Published by:  News18 Desk

चंद्रपूर, 08 ऑगस्ट: शनिवारी पहाटे चंद्रपूरातील संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थानातील दानपेटी फोडल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यानं मंदिरातील सीसीटीव्हीला पेंट फासून दानपेटीवर डल्ला मारला आहे. या घटनेचा माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या एका तासात आरोपी तरुणाला अटक केली आहे. या चोरीमागचं धक्कादायक कारण पोलीस तपासात समोर आलं आहे. वडिलांच्या उपचारासाठी पैसे नसल्यानं आपण मंदिरातील दानपेटी फोडल्याची माहिती आरोपी तरुणानं दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

श्रेयस दुर्गे असं चोरी करणाऱ्या आरोपी तरुणाचं नाव आहे. मागील काही काळापासून त्याच्या वडिलांची प्रकृती बिघडली आहे. या संकटकाळात मदतीसाठी कुणीही पुढे सरसावत नाहीये, त्यामुळे आपण मंदिरातील दानपेटी फोडली असल्याची कबुली दुर्गेशनं दिली आहे. नाईलाजानं ही चोरी करावी लागल्याचं त्यानं पोलीस चौकशीत सांगितलं आहे. पोलिसांनी सध्या आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

हेही वाचा-बाईक चोरी करायची, पेट्रोल संपलं की तिथेच सोडून द्यायची, अखेर चोराला घडली अद्दल..

संत परमहंस कोंडय्या महाराज मंदिर हे महाराष्ट्र आणि तेलंगणातील भाविकांसाठी आराध्य देवस्थान आहे. दोन्ही राज्यांतून हजारो भाविक दरवर्षी याठिकाणी दर्शनासाठी येत असतात. पण सध्या लॉकडाऊन आणि कोरोना निर्बंध असल्यानं मंदिरात फारशी गर्दी नाहीये. हीच संधी साधत तरुणानं या मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारला आहे.

हेही वाचा-केरळच्या बँकेतील साडेसात किलो सोन्यावर मारला डल्ला; साताऱ्यातून चौघांना अटक

सामनानं दिलेल्या वृत्तानुसार, यापूर्वीही चार वेळा या मदिरातील दानपेटीवर डल्ला मारण्यात आला आहे. संबंधित मंदिराचे पुजारी शनिवारी पहाटे शेगमवार महाराज महासमाधीची पूजा करण्यासाठी गेले होते. त्याच दरम्यान या मंदिरात चोरी करण्यात आली आहे. मंदिराचे पुजारी जेव्हा परत आले तेव्हा मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर पेंट फासल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. तसेच दानपेटी फोडल्याचंही त्यांना दिसून आलं. या घटनेचा पुढील तपास चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Chandrapur, Crime news, Theft