मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मुलाने बापाचा खून केला अन् आईवर केले चाकूने वार, कल्याणमधील घटना

मुलाने बापाचा खून केला अन् आईवर केले चाकूने वार, कल्याणमधील घटना

वडिलांनी (father murder) आपल्यावर हल्ला करीत स्वतः आत्महत्या केल्याचा मुलाने रचलेला बनाव अखेर पोलिसांनी उघडकीस आणला.

वडिलांनी (father murder) आपल्यावर हल्ला करीत स्वतः आत्महत्या केल्याचा मुलाने रचलेला बनाव अखेर पोलिसांनी उघडकीस आणला.

वडिलांनी (father murder) आपल्यावर हल्ला करीत स्वतः आत्महत्या केल्याचा मुलाने रचलेला बनाव अखेर पोलिसांनी उघडकीस आणला.

 कल्याण, 14 डिसेंबर : वडिलांनी (father murder) आपल्यावर हल्ला करीत स्वतः आत्महत्या केल्याचा मुलाने रचलेला बनाव अखेर पोलिसांनी उघडकीस आणला. मुळात मुलानेच (son killed his father ) कौटुंबिक वादातून वडिलांची हत्या करून आईवर हल्ला केल्याचे आता पोलीस तपासात समोर आले आहे. या हत्येमुळे कल्याण (kalyan) शहरात खळबळ उडाली असून आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी कल्याण पश्चिमेकडील चिकणघर परिसरात निखिला हाईट्स ही हाय प्रोफाइल  सोसायटीमध्ये राहणारे सेवानिवृत्त मोटरमन प्रमोद बनोरिया यांचा मृतदेह त्यांच्या घरात सापडला होता. याच वेळी त्यांची पत्नी कुसुम आणि मुलगा लोकेश हे दोघे घरात जखमी अवस्थेत आढळले होते. यावेळी वडिलांनी आपल्यावर हल्ला करून स्वतः आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. मात्र अवघ्या २४ तासात मृत प्रमोद याच्या पत्नीने मुलाने पतीची हत्या करून स्वतःला जखमी केल्याचे पोलीस तपासात सांगितलं.शिवाय मुलगा लोकेशने देखील ही कबुली दिली.

Saraswati river | सरस्वती नदी खरोखरच नामशेष झाली आहे का? काय आहे तथ्य?

घटनेच्या दिवशी वडील आणि मुलात जोरदार वाद झाला होते, या कौटुंबिक वादातून लोकेश याने वडिलांवर चाकूने हल्ला करत त्यांची हत्या केली. वाद सोडवण्यासाठी आईमध्ये आली आणि तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण लोकेशने आपल्या आईवर सुद्धा चाकूने सपासप वार  केले. या हल्ल्यात आई गंभीर जखमी झाली. आता या हत्येचा उलघडा होताच कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी लोकेशच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

त्या दिवशी काय घडलं?

१२ डिसेंबरला घरातील एका खोलीत प्रमोद हे मृत अवस्थेत पडले होते. तर मुलगा लोकेश आणि त्यांची पत्नी कुसुम जखमी अवस्थेत पडले होते. याच अवस्थेत लोकेश ने वॉचमनला रुग्णवाहिका पाहिजे म्हणून फोन केला, मात्र वॉचमनला संशय आल्याने त्यांनी सोसायटीच्या सदस्यांना सांगितलं. सदस्यांनी घरी जाऊन पाहिलं असता त्यांना धक्का बसला. त्यानंतर रहिवाशांनी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना एक घटनेबाबत माहिती दिली. घटना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घरात जाऊन पाहिले असता एक महिला जखमी अवस्थेत आहे तर एक इसमाचा मृतदेह पडलेला आढळला. कल्याण डीसीपी सचिन गुंजाळ आणि एसीपी उमेश माने पाटील घटना स्थळी दाखल झाले आणि पोलीस तपास सुरू केला आहे.कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र पोलिसांनी शिताफीने तपास सुरू केला. लोकेशची आई शुद्धीवर आल्यानंतर तिने घडलेली घटना सांगितली. त्यानंतर  प्रकरणाचा उलगडा झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी लोकेशच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

First published:

Tags: कल्याण, चाकू हल्ला