Home /News /maharashtra /

लेकानं जन्मदात्यावर उगवला सूड; चाकूने सपासप वार करत पाडलं रक्ताच्या थारोळ्यात, सातारा हादरलं!

लेकानं जन्मदात्यावर उगवला सूड; चाकूने सपासप वार करत पाडलं रक्ताच्या थारोळ्यात, सातारा हादरलं!

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

Murder in Satara: पोटच्या लेकानं जन्मदात्या बापाची चाकूने सपासप वार (Attack with knife) करत निर्दयी हत्या (father brutal murder by son) केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे.

    सातारा, 15 सप्टेंबर: पोटच्या लेकानं जन्मदात्या बापाची चाकूने सपासप वार (Attack with knife) करत निर्दयी हत्या (father brutal murder by son) केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात मुलासह त्याच्या आईवर गुन्हा दाखल (FIR Lodged) करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत. बबन पांडुरंग पवार असं हत्या झालेल्या 56 वर्षीय वडिलांचं नाव असून ते सातारा शहरातील मंगळवार पेठेतील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बबन याचं पत्नी वर्षा पवार यांच्याशी किरकोळ कारणातून अनेकदा वाद व्हायचे. दरम्यान सोमवारी रात्री नऊ वाजता जेवण का नाही दिलं, यावरून मृत बबन यांनी पत्नी वर्षा यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. यानंतर हा वाद विकोपाला गेल्यानं मुलगा सुरजनं आई वडिलांच्या भांडणात उडी घेतली. हेही वाचा-लोखंडी स्टॅण्डचे तीन घाव अन् खेळ खल्लास; 'ये शैतान मुझे तकलीफ दे रहा है' म्हणत.. मुलगा सुरज आणि त्याची आई वर्षा हे दोघं बबनला भांडत होते. दरम्यान वाद वाढत गेल्यानंतर संतापाच्या भरात सुरजने घरातील चाकू आणत आपल्या जन्मदात्या पित्यावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की, बबन पवार रक्तबंबाळ होऊन खाली कोसळले. या घटनेची माहिती मिळताच बबन यांचे भाऊ राजू पवार यांनी त्वरित त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण रुग्णालयात उपचार करण्यापूर्वीच डॉक्टरनं बबन यांना मृत घोषित केलं आहे. हेही वाचा-पतीचा तो शब्द लागला जिव्हारी; महिलेनं ब्लेडनं स्वतःची जीभ कापून रस्त्यावर फेकली याप्रकरणी भाऊ राजू पवार यांच्या फिर्यादीवरून मुलगा सुरज पवार आणि पत्नी वर्षा पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. केवळ वेळेवर जेवण न दिल्याच्या कारणातून वाद आणि त्यातून घडलेल्या या हत्येनं परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Murder, Satara

    पुढील बातम्या