• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • शेअर मार्केटचा नाद डोक्यात गेला, आईने रोखले म्हणून स्क्रू ड्रायव्हरने खून, 2 वर्षांनंतर विकृत मुलगा अखेर अटकेत

शेअर मार्केटचा नाद डोक्यात गेला, आईने रोखले म्हणून स्क्रू ड्रायव्हरने खून, 2 वर्षांनंतर विकृत मुलगा अखेर अटकेत

 29 जानेवारी 2019 रोजी रागाच्या भरात जन्मेशने आपल्या जन्मदात्यांना मारहाण सुरू केली. रागाच्या भरात घरात हाती लागेल त्या वस्तूने त्याने वडिलांवर हल्ला चढवला

29 जानेवारी 2019 रोजी रागाच्या भरात जन्मेशने आपल्या जन्मदात्यांना मारहाण सुरू केली. रागाच्या भरात घरात हाती लागेल त्या वस्तूने त्याने वडिलांवर हल्ला चढवला

29 जानेवारी 2019 रोजी रागाच्या भरात जन्मेशने आपल्या जन्मदात्यांना मारहाण सुरू केली. रागाच्या भरात घरात हाती लागेल त्या वस्तूने त्याने वडिलांवर हल्ला चढवला.

 • Share this:
  नालासोपारा, 21 सप्टेंबर : दोन वर्षांपूर्वी आपल्या आईचा (mother murder) खून करून फरार झालेल्या विकृत मुलाला अखेर नालासोपारा पोलिसांनी (nalasopara police) बेड्या ठोकल्या आहे. या विकृत मुलाने आधी आईचा खून केला आणि त्यानंतर स्क्रू ड्रायव्हर, चाकू आणि हातोडीने वार करून वडिलांना जखमी करून पळ काढला होता. अखेर पश्चिम बंगालमधून या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  29 जानेवरी 2019 मध्ये नालासोपारा (nalasopara) पश्चिम भागातील इम्पीरियल टॉवर भागात ही घटना घडली होती. या परिसरात राहणाऱ्या जन्मेश पवार (janmesh pawar) या 20 वर्षीय तरुणाने आपल्या जन्मदात्या वडिल नरेंद्र पवार (narendra pawar) यांच्यावर स्क्रू ड्रायवर,चाकू आणि हातोडीने गंभीर वार केला होता. या हल्ल्यात नरेंद्र पवार हे गंभीर जखमी झाले होते. जन्मेश एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने आई नम्रता पवार यांचाही खून केला होता. आई-वडिलांचा खून केल्यानंतर जन्मेश पळून गेला होता. तब्बल 32 महिन्याच्या तपासानंतर नालासोपारा पोलिसांनी  त्याला पश्चिम बंगालमधून अटक केली आहे. गृहकर्ज घेताय तर लक्षात घ्या हे महत्त्वाचे 6 मुद्दे! सोप्या पद्धतीने मिळेल Loan जन्मेश याला शेअर मार्केटमध्ये (stock market) पैसे कमवण्याचा नाद लागला होता. पण, आई वडिलांनी त्याला समज दिला होता. तसंच, शेअर मार्केटमध्ये पैसे न गुंतवण्याचा सल्ला दिला होता. त्याचाच राग मनात धरून जन्मेशने आपल्या आई-वडिलांवरच प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात आईचा मृत्यू झाला होता. तर वडील गंभीर जखमी झाले होते. आई-वडिल जन्मेशला समजावून सांगत होते. पण, 29 जानेवारी 2019 रोजी रागाच्या भरात जन्मेशने आपल्या जन्मदात्यांना मारहाण सुरू केली. रागाच्या भरात घरात हाती लागेल त्या वस्तूने त्याने वडिलांवर हल्ला चढवला. स्क्रु ड्रायव्हर आणि हातोडीने त्याने आईचा खून केला. नंतर वडिलांवरही त्याने सपासप वार केले. बापरे! हॉटेलमधील बर्गरमध्ये होता विंचू, पहिला घास खाताच तरुण हॉस्पिटलमध्ये दाखल आई- वडिलांची हत्या केल्यानंतर जन्मेश पळून गेला होता. त्याने अनेक ठिकाणी लपून छपून दिवस काढले. पण काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या राहण्याचा ठिकाणा पोलिसांना कळला. त्यानंतर पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन जन्मेशच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्याच्याविरोधात आधीच खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला आता कोर्टात हजर केले जाणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
  Published by:sachin Salve
  First published: