आई-वडिलांची भोसकून निर्घृण हत्या, वाचवण्यासाठी आलेल्या भावावरही केला हल्ला

आई-वडिलांची भोसकून निर्घृण हत्या, वाचवण्यासाठी आलेल्या भावावरही केला हल्ला

आई-वडिलांची भोसकून निर्घृण हत्या, वाचवण्यासाठी आलेल्या भावावरही केला हल्ला

  • Share this:

रूपनदेही, 8 डिसेंबर : तरुणाने रागातून आई आणि वडिलांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसंच या तरुणाने आपल्या भावावरही हल्ला केला आहे. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या भावाला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

कौटुंबिक कलहातून गोरख यादव या तरुणाचे आपल्या आई-वडिलांशी भांडण झाले. त्यानंतर हा वाद विकोपाला गेला आणि गोरखने घरातील टोकदार वस्तूच्या आधारी आई-वडिलांची भोसकून हत्या केली. त्यावेळी गोरखचा एक भाऊ त्या जखमींना वाचवण्यासाठी पुढे आला मात्र गोरखने त्याच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात गोरखचा भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

नारायण यादव (72) आणि खगना यादव (70)असं मृत आई-वडिलांचं नाव आहे. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या योगेंद्र यादव याच्यावरही हल्ला झाला. भारत-नेपाळ सीमेवरील रुपनदेही जिल्ह्यात हा सगळा प्रकार घडला आहे. यादव कुटुंब हे रुपनदेही जिल्ह्यातील सतियाग शहरातील बालापूर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोरखला अजून इतर पाच भाऊ आहेत आणि या सगळ्यात गोरख सर्वात लहान आहे. मात्र त्यानेच आपल्या आई-वडिलांना संपवलं. याबाबत पोलिसांनी कारवाई करत गोरख यादवला ताब्यात घेतलं आहे. पोटच्या मुलानेच आई-वडिलांना क्रूरपणे संपवल्याने परिसरात खळबळ उडाली. आरोपी गोरख आणि त्याच्या आई-वडिलांमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यावरून वाद झाला, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 8, 2019 04:42 PM IST

ताज्या बातम्या