शेतीच्या हिस्सेवाटणी वरून मुलाने केला बापाचा निर्घृण खून

नामदेवला शेतीतला आपला वाटा पाहिजे होता तर जिवंत असेपर्यंत वाटणी नाही असं वडिलांचं मत होतं. त्यामुळे रागाने त्याने वडिलांची हत्या केली.

News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2019 09:20 PM IST

शेतीच्या हिस्सेवाटणी वरून मुलाने केला बापाचा निर्घृण खून

भास्कर मेहरे यवतमाळ 25 जुलै : जिल्ह्यातील झरीजामनी तालुक्यातील खापरी या गावांत धक्कादायक घटना घडलीय. जमीनीच्या वादातून मुलानेच वडिलांचा निघृण खून केलाय. दत्तू उरवते यांचं आणि त्यांचा मुलगा नामदेव याचं शेतीच्या हिस्सेवाटणी कायम भांडण होत असे. नामदेवला शेतीतला आपला वाटा पाहिजे होता तर जिवंत असेपर्यंत वाटणी नाही असं वडिलांचं मत होतं. त्यामुळे रागाने त्याने वडिलांची हत्या केली. या घटनेने सर्व गावच हादरून गेलं असून पोलिसांनी मुलगा नावदेवला अटक केलीय.

लग्नाचे आमिष दाखवून औरंगाबादेतील विवाहितेवर वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार

काही दिवसापासून शेतीच्या हिस्सेवाटणी वरून उरवते यांच्या घरामध्ये वाद सुरू होता. खापरी या गावांमध्ये वडील दत्तू उरवते (67)आणि मुलगा नामदेव उरवते यांनी नेहमीप्रमाणे रात्री एकत्र जेवण केले. वडील व आई हे आपल्या खोलीमध्ये झोपी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास मुलगा नामदेव (35)हा उठला आणि त्याने वडिलांच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र विकृत पद्धतीने मुलाने दोन तास डोक्यावर वार करीत राहिला.

साप चावल्याने 'मृत' घोषीत केलेल्या मुलीला बापाने सोडवलं मृत्यूच्या तावडीतून

पहाटे या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी या ठिकाणी गर्दी केली. पोलीस पाटलांनी तातडीने पाटण पोलीस स्टेशनशी संपर्क साधून  गावात घडलेल्या घटनेची माहिती दिली. पाटण पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमोल बारापात्रे यांनी घटनास्थळ गाठून आरोपी नामदेव उरवते याला अटक केली. पोलीस आता सर्वच शक्यता पडताळून पाहत असून त्यांनी चौकशीला सुरुवातही केलीय.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2019 09:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...