• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • घरगुती वादातून जावई संतापला अन् कुटुंब संपवण्यासाठी पेटवून दिलं घर, बुलडाण्यातील धक्कादायक घटना

घरगुती वादातून जावई संतापला अन् कुटुंब संपवण्यासाठी पेटवून दिलं घर, बुलडाण्यातील धक्कादायक घटना

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

Crime News Marathi: घरगुती वादानंतर संतापलेल्या जावयाने थेट घर पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

 • Share this:
  राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा, 6 ऑक्टोबर : कौटुंबिक वादानंतर जावयाने संपूर्ण कुटुंब संपवण्याचा कट रचला आणि घरच पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुलडाणा (buldhana) जिल्ह्यातील संग्रामपूर (Sangrampur) तालुक्यातील टुनकी येथे ही घटना घडली आहे. घरगुती वादातुन भांडण करुन घराला आग (house set on fire) लावून कुटुंबास पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सोनाळा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. टुनकी येथील कस्तुराबाई साहेबराव मंडासे वय 60 वर्षे यांनी सोनाळा पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, मी आणि मुलगी, नातवंडे अघरी असताना अंबादास झाल्टे हा दारु पिऊन घरी आला. त्याने मला आणि मुलीला शिवीगाळ केली. इतकेच नाही तर मुलीला लाथाबुक्क्याने मारहाण करुन जिवे मारुन टाकेल अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने घर पेटवून देण्याची धमकी दिली. केवळ एवढ्यावरच न थांबता त्याने घर पेटविले. घराला आग लावल्याने घरातील सर्व महत्वाची कागदपत्रे आणि जिवनावश्यक वस्तू जळून नुकसान झाले. सुदैवाने मुलीसह नातवंडे घराबाहेर पडल्याने जिव वाचला. या तक्रारीवरुन सोनाळा पोलिसात गुन्हा दाखल करुन अंबादास कैलास झाल्टे यास अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पाटण्यात माथेफिरू जावयाने गाठला क्रूरतेचा कळस किरकोळ भांडणाचा राग डोक्यात ठेऊन जावयानं सासरच्या मंडळींना पेटवून दिल्याची घटना उघड झाली आहे. काही दिवसांपूर्वी सासूरवाडीतील मंडळींशी झालेल्या भांडणानंतर जावयाने सर्वांना मारून टाकण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर सासरच्या मंडळींनी पोलिसांना याची कल्पनाही दिली होती. मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि जावयानेच आपला शब्द खरा करून दाखवला, अशी चर्चा गावात सुरू आहे. ही घटना आहे बिहारच्या बरहट गावातील. सासरच्या मंडळींसोबत झालेल्या वादानंतर जावयाने घराला आग लावून सर्वांचा बदला घेतला. जावई माथेफिरू आणि गरम डोक्याचा असल्याची कल्पना सर्वांना होती, मात्र तो या थऱाला जाईल, असे कुणालाही वाटले नव्हते. घरात सासू, सासरे, मेहुणा आणि मेहुणी असतानाच त्याने घराला कुलूप लावून आग लावली. एका कापडाच्या मदतीने त्याने आग पेटवली आणि सासरच्या मंडळींना एका खोलीत कोंडून पेटवून दिले. या घटनेत सासू बीबी मरजिना आणि मेहुणा अबुजर यांचा मृत्यू झाला आहे. तर सासरे मो. इशराद आणि मेहुणी शाईस्ता हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सासरच्या मंडळींना जिवंतपणी पेटवून दिल्यानंतर जावाई मोसम्मिन फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
  Published by:Sunil Desale
  First published: