भंडारा, 11 जुलै: भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील तुमसर याठिकाणी एका तरुणानं लोखंडी पाइपनं (Iron pipe) डोक्यावर आणि मानेवर सपासप वार करत आपल्या जन्मदात्या वडिलांची निर्घृण हत्या (Son killed father) केली आहे. या दुर्दैवी घटनेत वडील रक्त्याच्या थारोळ्यात खाली कोसळले. नातेवाईकांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. देव्हाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल (FIR Lodged) करण्यात आला असून याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
राजेश बंधाटे असं हत्या झालेल्या 45 वर्षीय वडिलांचं नाव आहे. तर रोहित बंधाटे असं 24 वर्षीय आरोपी मुलाचं नाव आहे. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मृत राजेश आणि आरोपी मुलगा रोहित यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. सुरुवातीला बाचाबाची झाल्यानंतर दोघांत कडाक्याचं भांडण झालं. यातून संतापलेल्या रोहीतनं आपल्या जन्मदात्या वडिलांना लोखंडी पाइपनं डोक्यात आणि मानेवर सपासप वार केले.
हेही वाचा-नागपुरच्या हत्याकांडाची पुनरावृत्ती; एक ब्रेकअप आणि तीन मर्डरचा थरार
मुलानं केलेल्या मारहाणीत वडील राजेश रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. यानंतर कुटुंबीयांनी तातडीनं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हेही वाचा-हत्या, आत्महत्या की दुर्घटना?या पुस्तकानं वाढवलं 14 वर्षीय मुलीच्या मृत्यूचं गूढ
या प्रकरणी आरोपी रोहित बंधाटे याला तुमसर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी 302 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. मुलाच्या हातून वडिलांची हत्या झाल्यानं गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhandara Gondiya, Crime news, Father, Murder