Home /News /maharashtra /

भंडारा: चिमुकल्याला वाचवण्यासाठी लावली जिवाची बाजी, धावत्या रेल्वेतून पडून मायलेकाचा दुर्दैवी अंत

भंडारा: चिमुकल्याला वाचवण्यासाठी लावली जिवाची बाजी, धावत्या रेल्वेतून पडून मायलेकाचा दुर्दैवी अंत

Accident in Bhandara: रात्रीच्या रेल्वेने नागपूरहून रेवा येथे जाणाऱ्या मायलेकाचा धावत्या रेल्वेतून पडून (son and mother fall down from running train) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    भंडारा, 04 जानेवारी: रात्रीच्या रेल्वेने नागपूरहून (Nagpur) रेवा येथे जाणाऱ्या मायलेकाचा धावत्या रेल्वेतून पडून (son and mother fall down from running train) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देव्हाडा माडगी येथील वैनगंगा नदीच्या पुलावर (Vainganga river bridge) ही दुर्दैवी घटना घडली आहे. सोमवारी दुपारी रेल्वेचे कर्मचाऱ्यांना मायलेकाचा मृतदेह दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि करडी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पूजा इशांत रामटेके असं मृत पावलेल्या 27 वर्षीय महिलेचं नाव आहे. तर अथर्व इशांत रामटेके असं दीड वर्षाच्या मृत चिमुकल्याचं नाव आहे. लष्करात जवान असलेले इशांत रामटेके हा गेली काही दिवसांपासून सुट्टीवर आले होते. सुट्टी संपल्यानंतर ते पुन्हा नागपूरहून आपल्या कुटुंबीयांसह रेवा येथे जाण्यासाठी निघाले होते. रात्रीच्या रेल्वेनं हे कुटुंब प्रवास करत होतं. तुमसर रेल्वे स्थानकावरून गाडी पुढील प्रवास करत असताना, इशांत यांची पत्नी पूजा यांना लघुशंका लागल्याने त्या आपल्या पतीला सांगून डब्यातील प्रसाधनगृहाकडे  गेल्या होत्या. हेही वाचा-VIDEO: खुल्लम खुला प्यार करेंगे, औरंगाबादेत चालत्या दुचाकीवर कपलचा KISSING सीन यावेळी दीड वर्षांचा अथर्व आईच्या पुढे धावत गेला. काही कळायच्या आतच तो माडगी व देव्हाड दरम्यान असलेल्या वैनगंगा नदीवरील रेल्वेपुलावरून नदीत पडला. यावेळी अथर्वच्या पाठीमागे आलेल्या पूजा यांनी चिमुकल्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात पूजा देखील धावत्या रेल्वेतून खाली पडल्या. यामध्ये दीड वर्षाच्या अथर्वचा नदीच्या पाण्यात बुडून तर आईचा पुलावरील खांबाचा मार बसून लटकलेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याचा संशय प्राथमिक माहितीच्या आधारावर पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. हेही वाचा-'आई, मला माफ कर' सुसाईड नोट लिहून नवविवाहितेची आत्महत्या, नाशकातील खळबळजनक घटना ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याने आसपासच्या प्रवाशांना देखील नेमकं काय घडलं, याचा तपास लागला नाही. बराच वेळ होऊनही पत्नी आणि मुलगा परत आले नाहीत, म्हणून सैनिक इशांत रामटेके यांनी धावत्या रेल्वेत पत्नी आणि मुलाची सर्वत्र शोधाशोध केली. पण काहीही थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर इशांत यांनी गोंदिया पोलीस ठाण्यात पत्नी आणि मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली. पण घटनेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी रेल्वे कर्मचारी गस्तीवर असताना, कर्मचाऱ्यांना वैनगंगा नदीत मुलाचा तर रेल्वे पुलावर महिलेचा मृतदेह आढळला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bhandara Gondiya, Crime news

    पुढील बातम्या