कर्जबाजारीपणातून पिता-पूत्राची आत्महत्या, सूनेने घेतली सासू-सासऱ्यांची जबाबदारी

कर्जबाजारीपणातून पिता-पूत्राची आत्महत्या, सूनेने घेतली सासू-सासऱ्यांची जबाबदारी

घरात कर्ता पुरुष नसल्याने संसाराचा गाढा कसा ओढायचा असा प्रश्न सूनेसमोर येऊन ठेपला आहे

  • Share this:

लोहा, 16 फेब्रुवारी : सततचा कर्जबाजारीपणा व आर्थिक अडचणीमुळे वैतागलेल्या पिता-पुत्राने गावातील शिवारातील विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवला. या दुर्देवी घडनेनंतर गावात शोककळा पसळली आहे. शुक्रवारी या पिता-पुत्राने आत्महत्या केल्याचे वृत्त लोकमत या वृत्तपत्राने दिलं आहे. काल शनिवारी या पिता-पुत्रांच्या पार्थिवावर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. माळाकोळीजवळील वागदरवाडी येथील केरबा पांडू केंद्रे यांच्याकडे तब्बल साडेपाच एकर वड़िलोपार्जित जमीन आहे. ही शेतजमीन कोरडवाहू आहे. त्यांनी या शेतजमिनीवर कर्ज घेतले होते. मात्र ते गर्ज फेडता न आल्याने त्या दोघांनी आपलं आयुष्य संपवल. त्यांनी उचललेल्य़ा या पावलामुळे घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आता संसाराचा गाढा कसा ओढायचा असा मोठा प्रश्न त्या घरातील सूनेसमोर उभा राहिला आहे. शिवाय घरात वृद्ध सासू-सासरे आणि बाळंतपणासाठी माहेरी आलेली नणंद आहे. या सर्वांची जबाबदारी एकट्या सूनेवर येऊन पडली आहे.

केरबा केंद्र यांनी महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेतून 60 हजार रुपये आणि खासगी सावकाराकडून अडीच लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. इतकचं नाही तर त्यांनी महिंद्रा फायनान्सकडून दीड लाख रुपयांचे गृहकर्ज काढून पक्क घरं उभं केलं. त्यांच्या मोठ्या मुलीचं गेल्या वर्षी लग्न झालं होतं. त्यातही बराच खर्च आला होता. वडिलांना कर्जातून बाहेर काढण्यासाठी अकरावीत शिकणारा 17 वर्षीय एकूलता एक मुलगा त्यांना मदत करीत होता. सातत्याने सावकार, बॅंक यामुळे चिंतेत असणारे पिता केरबा केंद्रे आणि मुलगा शंकर केंद्रे यांनी हे पाऊल उचलल्याचे मृत केरबा यांच्या पत्नी प्रयागबाई केंद्रे यांनी सांगितले. सध्या घराची जबाबदारी प्रयागबाई केंद्रे यांच्या खाद्यांवर आली आहे. याशिवाय 85 ते 90 वर्षांचे वृद्ध सासू-सासऱ्यांची काळजी घेण्याची जबाबदारीही केंद्रेंच्या सून प्रयागबाई यांच्यावर आली आहे.

First published: February 16, 2020, 11:49 AM IST

ताज्या बातम्या