Home /News /maharashtra /

कर्तव्य मोठे! नगर परिषदेत असलेल्या मुलाने जप्त केले आईने लावलेल्या भाजीपाल्याचे टोपले!

कर्तव्य मोठे! नगर परिषदेत असलेल्या मुलाने जप्त केले आईने लावलेल्या भाजीपाल्याचे टोपले!

कर्तव्यात नात्याचा अडसर येऊ न देता प्रसंगी घरच्या माणसावर कायदेशीर कारवाई केल्याची उदाहरणे पहायला मिळतील. नगरच्या पाथर्डी (Pathardi Ahmednagar) येथेही अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे.

    अहमदनगर, 08 मे : प्रत्येकानं आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. प्रत्येकाने ज्याचं-त्याचं काम कर्तव्यनिष्ठेनं केलं तर काही समस्याच उरणार नाहीत, यावर काहींचा विश्वास असतो. या भावनेतून अनेक ठिकाणी आपल्याला कर्तव्यनिष्ठेनं काम करणारी लोक दिसतील. कर्तव्यात नात्याचा अडसर येऊ न देता प्रसंगी घरच्या माणसावर कायदेशीर कारवाई केल्याची उदाहरणे पहायला मिळतील. नगरच्या पाथर्डी (Pathardi Ahmednagar) येथेही अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. हातावर पोट असलेली भाजी विक्रेती आई आणि नगरपरिषदेत चतुर्थश्रेणी कर्मचारी असलेल्या तिच्या मुलाच्याबाबतीत अशी घटना घडली आहे. रस्त्यावर बसून भाजी विकणाऱ्या आपल्या आईचा भाजीपाला तिच्या मुलानेच जप्त करून नेला. नगर जिल्ह्यात सध्या कडक टाळेबंदी (Ahmednagar Lockdown) असून भाजीची दुकानेही बंद ठेवण्याचा आदेश आहे. एका जागी बसून भाजी विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरीही पाथर्डी शहरात गर्दी होत असल्याचा तक्रारी येत होत्या. त्यामुळे झालेल्या बैठकीत कारवाई करण्याचा निर्णय झाला. नगरपरिषदेचे पथक वाहन घेऊन भाजी विक्रेते बसतात त्या ठिकाणी आले. पथकात रशीद शेख यांचाही समावेश होता. त्यांची आई बेगम रफीक शेख भाजी विक्रेत्या आहेत. त्याही याच रस्त्यावर भाजी विकत बसल्या होत्या. त्यामुळे रशीद समोर मोठा प्रश्न निर्माण आता कारवाई करावी तरी कशी? कारण समोर तर दुसरं-तिसरं कोणी नसून आईच आहे. मात्र, रशीद शेख यांनी कोणताही विचार न करता आपल्या आईच्या पुढ्यातील भाजीच्या टोपल्या उचलून नेवून कचरा गाडीत टाकल्या. हा प्रकार त्याची आई पाहतच राहिली. हे वाचा - कोरोनामध्ये माणुसकीचं दर्शन घडवतोय हा तरुण; दररोज 100 हून अधिक कोरोनाग्रस्तांना मोफत जेवण शेख यांनी आपल्या आईचीच भाजी जप्त केल्याची माहिती शहरात पसरली तेव्हा त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेचं कौतुक करण्यात आलं. मात्र, टाळेबंदीला विरोध असणाऱ्यांनी टीकाही केली, कारण भाजी ही अत्यावश्यक बाबीत येते. तर संबंधित तहसीलदार आणि पालिका अधिकाऱ्यांनीही शेख यांनी कोणताही भेदभाव न करता केलेल्या कारवाईचे कौतुक केलंय. गर्दी होत असल्यानं करोना वाढतच आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी नियम पाळले पाहिजेत. नियम सर्वांसाठी आहेत. त्यामुळे करवाई करताना मी समोर आई असतानाही विचार केला नाही आणि तिच्यावरही इतरांप्रमाणेच कारवाई केली. सर्वांना माझे आवाहन आहे की, नियमांचे पालन करावे, अन्यथा आम्ही कारवाई करत राहू, असे या घटनेवर प्रतिक्रिया देताना रशीद शेख म्हणाले. हे वाचा - 10 सेकंद श्वास रोखता येणं म्हणजे मला खरंच कोरोना संसर्ग नाही का? शहरात सध्या या कारवाईची चांगलीच चर्चा आहे. शेख यांनी केलेली कारवाई छोटी वाटत असली तरी हातावर पोट असलेली भाजी विक्रेती आई आणि पालिकेत साधा कर्मचारी असलेला तिचा मुलगा यांच्यासाठी ती तुलनेत मोठी आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ahmednagar, Ahmednagar News, Corona updates

    पुढील बातम्या