मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रुग्णालयात कुणी तरी ऑक्सिजन सिलेंडरचा कॉक केला बंद, 2 जणांचा गेला जीव, बीडमधील घटना

रुग्णालयात कुणी तरी ऑक्सिजन सिलेंडरचा कॉक केला बंद, 2 जणांचा गेला जीव, बीडमधील घटना

बीड जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक सातमध्ये पॉझिटिव्ह असलेले दोन रुग्ण दगावल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली.

बीड जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक सातमध्ये पॉझिटिव्ह असलेले दोन रुग्ण दगावल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली.

बीड जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक सातमध्ये पॉझिटिव्ह असलेले दोन रुग्ण दगावल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली.

बीड, 24 एप्रिल : नाशिकमध्ये ऑक्सिजनचा (nashik oxygen leak) पुरवठा लिक झाल्यामुळे 26 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना बीडमधील (beed district hospital) जिल्हा रुग्णलायात ऑक्सिजनचा पुरवठा अज्ञात व्यक्तींना बंद केल्यामुळे दोन रुग्णांना जीव गमावण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणावर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांनी देखील अज्ञात व्यक्तीकडून ऑक्सिजन पुरवठा (Oxygen supply) करणारा मुख्य कॉक बंद झाल्यामुळे ऑक्सिजन पुरवठा रुग्णांना होऊ शकला नाही, अशी माहिती दिली आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी केली जाणार असून यात सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जाणार आहे. .

बीड जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक सातमध्ये पॉझिटिव्ह असलेले दोन रुग्ण दगावल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. यामध्ये गेवराई तालुक्यातील काठोडा येथील संजय राठोड यांचे वडील अचानक ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्यामुळे दगावल्याचा आरोप त्यांनी केला.

पुणेकरांना दिलासा! एप्रिल महिन्यात पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णसंख्या 4 हजारांखाली

याशिवाय नायगाव तालुका पाटोदा येथील राहुल कवठेकर यांच्या मामाचा अचानक ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

बीड जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुखदेव राठोड म्हणाले की, 'ऑक्सिजन पुरवठा करणारा सिलेंडरचा कॉक अज्ञात व्यक्तीकडून बंद झाल्यामुळे पुढे ऑक्सिजन पुरवठा होऊ शकला नाही. असे असले तरी जे रुग्ण दगावले आहेत. ते अत्यंत सिरीयस होते. त्यांचा स्कोर 18 ते 20 च्या दरम्यान होता. या सगळ्या प्रकरणाची चौकशी आम्ही करणार आहोत.'

'बीड जिल्हा रुग्णालयाच्या गलथान कारभार समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर चांगले उपचार होत नाहीत. आम्ही आमच्या रक्ताचे नाते रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे गमावले आहेत', असा आरोप ऑक्‍सिजन अभावी मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नातेवाईक यांनी केला आहे.

OSCAR 2021 : प्रियांका चोप्राचा The White Tiger जिंकणार ऑस्कर? एका क्लिकवर वाचा

'गावाकडून वीस किलोमीटरवरून येऊन ऑक्सिजन पुरवठा खंडित झालेला सर्व सुरळीत करण्यासाठी सांगितलं होतं मात्र बराच पुरवठा खंडित झाल्यामुळे अत्याचा जीव गेला', असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

जिल्हा रुग्णालयात नर्सिग कॉलेजमध्ये कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत. मात्र, या ठिकाणी मनुष्यबळ कमी आहे. वारंवार 167 पेशंट 29 कर्मचारी यामुळे अडचण येत आहे. ऑक्सिजन सिलेंडर संपल्यावर बदलण्यासाठी ज्यांची ड्युटी आहे ते थांबत नाहीत. सेक्युरिटी गार्ड नाही खूप अडचण आहे, असं कोविड सेंटरच्या वैद्यकीय अधिकारी प्राचार्य डॉ.सुवर्णा बेदरे यांना सांगितले.

बीड जिल्हा रुग्णालयातील या गंभीर परिस्थितीमुळे रुग्णाचे नातेवाईक देखील संतप्त झाले असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

First published: