मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /वाढत्या लोकप्रियतेमुळेच हल्ला - रामदास आठवले

वाढत्या लोकप्रियतेमुळेच हल्ला - रामदास आठवले

लोकप्रियतेमुळे  दुःस्वास करणाऱ्यांनी हा हल्ला केला असल्याची शक्यता आठवलेंनी व्यक्त केलीय

लोकप्रियतेमुळे दुःस्वास करणाऱ्यांनी हा हल्ला केला असल्याची शक्यता आठवलेंनी व्यक्त केलीय

लोकप्रियतेमुळे दुःस्वास करणाऱ्यांनी हा हल्ला केला असल्याची शक्यता आठवलेंनी व्यक्त केलीय

    मुंबई 9 डिसेंबर : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर शनिवारी हल्ला झाला होता त्याचं कारण त्यांनी आज सांगितलं. माझ्या वाढत्या लोकप्रियतेमुळे  दुःस्वास करणाऱ्यांनी हा हल्ला केला असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलीय. पोलिसांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था न ठेवल्याने हा प्रकार घडल्याचा आरोपही त्यांनी केला. या संदर्भात आठवले हे मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहेत. कार्यकर्त्यांनी शांतता ठेवावी असं आवाहनही रामदास आठवले यांनी केलंय. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या वांद्रे इथल्या बंगल्याची सुरक्षा व्यवस्था वढविण्यात आली आहे.

    रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांच्यावर शनिवारी अंबरनाथमध्ये हल्ला करण्यात आला. व्यासपीठावरुन उतरत असताना एका तरुणाने रामदास आठवले यांच्या कानशिलात लगावली. रिपाइंच्या कार्यकर्त्यानी या तरुणाला पाहताच पकडले आणि बेदम चोप दिला. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

    अंबरनाथ पश्चिममध्ये विको नाका परिसरात नेताजी मैदानात संविधान दिनानिमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला रामदास आठवले आले होते. यावेळी आठवले यांनी जवळपास अर्धा तास भाषण केलं. भाषण आटोपल्यानंतर रामदास आठवले स्टेजवरून खाली उतरत होते.

    त्यावेळी एक तरुण त्यांच्याजवळ गेला. या तरुणानं आठवले यांच्याशी हुज्जत घातली. काही कळण्याच्या आता या तरुणाने अचानक रामदास आठवले यांच्या कानशिलात मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घडल्यानंतर तिथे उपस्थिती असलेल्या रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला पकडलं आणि बेदम चोप दिला.

    त्यानंतर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं. मारणाऱ्या तरूणाची ओळख पटली असून प्रवीण गोसावी असं त्या तरुणाचं नाम आहे. आठवले यांच्याबद्दल त्याच्या मनात आकस होता. त्यातूनच हा हल्ला झाल्याचं बोललं जातंय.

     

     

     

    आठवले यांच्यावर हल्ला करणाऱ्या तरुणाला बेदम चोप, पहिला VIDEO

    First published:

    Tags: Ramdas athawale, RPI