मुख्यमंत्री देणार काँग्रेसला धक्का, सोमवारी भाजपमध्ये पुन्हा मोठी इनकमिंग

मुख्यमंत्री देणार काँग्रेसला धक्का, सोमवारी भाजपमध्ये पुन्हा मोठी इनकमिंग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत वानखेडे स्टेडियमच्या गरवारे क्लब इथं ही मेगाभरती पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 29 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यात आज काँग्रेसकडून विधानसभेच्या 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. असं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. सोमवारी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये काही नेत्यांचा प्रवेश होणार आहे. त्यामुळे अगदी विधानसभेच्या तोंडावर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत वानखेडे स्टेडियमच्या गरवारे क्लब इथं ही मेगाभरती पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यामध्ये अस्लम शेख, सोलापूरमधून सिद्धराम मेहेत्रे आणि भारत भालके, राहुल बोंद्रे, काशिराम पावरा, डी.एस. आहिरे या नेत्यांची नावं आहेत.

खरंतर आचारसंहिता लागल्यानंतर भाजपमधल्या उमेदवारांच्या प्रवेशाची संख्या कमी होईल असं म्हटलं जात होतं. मात्र, अजूनही अनेक नेते भारतीय जनता पक्षामध्ये येण्यास उत्सूक आहेत हेच यावरून स्पष्ट होतं. भाजपशी संपर्कात असल्यामुळे काही नेत्यांना काँग्रेसमधून उमेदवारीसाठी डच्चू दिला जाईल अशी चर्चा होती आणि त्यामुळेच हे नेते आता सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करतील असं सांगण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. कॉंग्रेसचे सचिव मुकुल वासनिक यांनी ही यादी जाहीर केली आहे. नव्या चेहऱ्यांना कमी संधी देण्यात आली असून या यादीवर जुन्या चेहऱ्यांचे प्राबल्य दिसत आहे. लातूरमधून अमित विलासराव देशमुख, सोलापूर मध्यमधून प्रणिती सुशिलकुमार शिंदे यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.

इतर बातम्या - विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, मुंबईत या उमेदवारांना मिळालं तिकीट!

अशी आहेत उमेदवार

अक्कलकुवा - के.सी पडवी

शहादा - पदमाकर विजयसिंग वालवी

नवापूर - शिरिष नाईक

रावेर - शिरिष चौधरी

बुलडाणा - हर्षवर्धन सकपाळ

मेहकर- अनंत वानखेडे

रिसोड - अमित जनक

धामनगाव - विरेंद्र जगताप

तिवसा - यशोमती ठाकूर

आर्वी - अमर शरद काळे

देवळी- रंजीत प्रताप कांबळे

सावनेर- सुनील छत्रपाल केदार

नागपूर उत्तर- एससी- डॉ. नितीन राऊत

ब्रह्मपुरी- विजय नामदेवराव वजेट्टीवार

चिमुर- सतीश मनोहर वर्जुराकर

वरोरा- प्रतिभा सुरेश धानोरकर

यवतमाळ- अनिल बाळासाहेब मांग्रुळकर

भोकर- अशोकराव शंकरराव चव्हाण

नांदेड उत्तर- डी.पी. सावंत

नायगाव- वसंतराव बळवंतराव चव्हाण

देगलूर- रावसाहेब जयवंत अनंतपुरकर

काळणूरी- संतोष कौतिका तर्फे

पाथरी- सुरेश अंबादास वारपुडकर

फुलंब्री- डॉ. कल्याण वैजंथराव काळे

मालेगाव (मध्य)- शैख असिफ शैख राशिद

अंबरनाथ- रोहित चंद्रकात साळवे

मिरा भाईंदर- सय्यद मुझफ्फर हुसेन

भांडूप (पश्चिम)- सुरेश हरिशचंद्र कोपरकर

अंधेरी (पश्चिम)- अशोकभाऊ जाधव

चांदिवली- मोहम्मद आरिफ नसीम खान

चेंबूर- चंद्रकात दामोदर हंदोरे

वांद्रे (पूर्व)- जिशान जियाउद्दीन सिध्दीकी

धारावी- वर्षा एकनाथ गायकवाड

इतर बातम्या - कॉंग्रेसच्या उमेदवांराची पहिली यादी जाहीर, जुन्या चेहऱ्यांचे प्राबल्य, येथे पाहा

सायन कोळीवाडा- गणेश कुमार यादव

मुंबादेवी- अमिन अमीराली पटेल

कोलाबा- अशोक अर्जुनराव जगताप

महाड-माणिक मोतिराम जगताप

पुरंदर- संजय चंद्रकांत जगताप

भोर- संग्राम अनंतराव तोपते

पुणे (sc) -रमेश अनंतराव बागवे

संगमनेर- विजय बाळासाहेब थोरात

लातुर शहर- अमित विलासराव देशमुख

निलंगा- अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर

औसा- बासवराज माधवराव पाटील

तुळजापूर- मधुकरराव देवराम चव्हाण

सोलापूर शहर मध्य- प्रणिती सुशील कुमार शिंदे

सोलापूर दक्षिण- मौलबी बाशुमिया सयीद

कोल्हापूर दक्षिण- ऋतुराज संजय पाटील

कारवीर- पी.एन. पाटील सादोळीकर

पळुस- कडेगाव- डॉ. विश्वजीत पतंगराव कदम

असा आहे विधानसभा निवडणूक कार्यक्रम..

- अर्ज भरण्याची तारीख : 27 सप्टेंबर

- अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 4 ऑक्टोबर

- अर्ज छाननी : 5 ऑक्टोबर

- अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 7 ऑक्टोबर

- मतदानाची तारीख : 21 ऑक्टोबर

- निकाल : 24 ऑक्टोबर

असे आहे 2014 मधील पक्षीय बलाबल..

- भाजप - 122 जागा

- शिवसेना - 63 जागा

- काँग्रेस - 42 जागा

- राष्ट्रवादी काँग्रेस - 41 जागा

- इतर - 20 जागा

- एकूण - 288 जागा

 

Published by: Renuka Dhaybar
First published: September 29, 2019, 8:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading