लष्कराच्या जवानाने मागितले 'इच्छा मरण', नजर चुकीने गेला होता पाकिस्तानच्या हद्दीत

लष्कराच्या जवानाने मागितले 'इच्छा मरण', नजर चुकीने गेला होता पाकिस्तानच्या हद्दीत

भारतीय लष्कराचे जवान चंदू चव्हाण यांनी अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता.

  • Share this:

दीपक बोरसे,(प्रतिनिधी)

धुळे,9 डिसेंबर: पाकिस्तानच्या तावडीतून सुटका झालेले भारतीय लष्कराचे जवान चंदू चव्हाण यांनी अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. आता न्याय मिळत नसल्याने चंदू चव्हाण यांनी इच्छा मरणाची मागणी केली आहे. चंदू चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेटू घेऊन इच्छा मरणाच्या मागणीचे निवेदन दिले. चंदू चव्हाण यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही पत्र पाठवले आहे.

देशाच्या नियंत्रण रेषावर (एलओसी) कर्तव्य बजावताना चंदू चव्हाण नजर चुकीने पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. नंतर चंदू चव्हाण यांची केंद्र सरकारने पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप केली होती. त्यानंतर मात्र, चंदू चव्हाण यांना आर्मी कोर्टाने दोषी ठरवले होते. चंदू चव्हाण यांचे कोर्ट मार्शल करत दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, चंदू चव्हाण हे पाकिस्तानच्या ताब्यात तीन महिने 21 दिवस होते. त्यावेळीही त्यांना त्रास सहन करावा लागला होता.

व्हिडिओ केला सोशल मीडियावर पोस्ट..

जवान चंदू चव्हाण यांनी अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून राजीनामा दिला आहे. लष्करातील अधिकाऱ्यांचा त्रासाला आणि जाचाला कंटाळून मी राजीनामा देतोय, असे चंदू चव्हाण यांनी स्पष्ट केले होते. यासंदर्भातला एक व्हिडिओच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. चंदू चव्हाण यांनी डी. एम. रेजिमेंट श्रीमान कमान अधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. सोशल मीडियावरील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

'मी लेखी स्वरुपात माझ्या वरिष्ठांकडे राजीनामा दिला आहे. मी माझ्या समस्या मागील तीन वर्षांपासून लेखी स्वरुपात दिल्या होत्या. मला पोस्ट हवी आहे आणि मला घरी जायचे आहे. मी पाकिस्तानातून सुटून आल्यापासून माझ्याकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टीकोन बदलला होता. पाकिस्तानातून आल्यापासून मला सतत त्रास दिला जात होता. शिक्षा दिल्याने माझे मानसिक खच्चीकरण झाले. मला न्याय मिळत नसल्याने मी त्रासाला कंटाळून राजीनामा देतो आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच न्याय मिळाला नाही तर आमरण उपोषण करणार, असे चंदू चव्हाण यांनी स्पष्ट केले होते.', असे ही त्यांनी सांगितले. मात्र, आपले ऐकून घेतले जात नाही, अशी तक्रार करत त्यांनी राजीनामा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2019 08:19 PM IST

ताज्या बातम्या