येवला, 6 एप्रिल : नियतीच्या क्रूरपणाचा प्रत्यय येवलावासियांना आला. कारण, जवान सागर खुरसने यांना अज्ञात वाहनानं धडक दिली. या धडकेत सागर खूरसने यांचा मृत्यू झाला. सागर खुरसने मोटार सायकलवरून जात असताना हा अपघात झाला. या धडकेत सागर खुरसने यांचा मुलगा आणि भाऊ गंभीर झाले आहेत. त्यांच्यावर आता येवलातील रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सागर खुरसने हे गुढीपाडव्यानिमित्त ठाणगाव या आपल्या मुळ गावी आले होते. त्यांच्या मृत्यूनं सागर खुरसने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मनमाडकडे जात असताना अपघात
सागर खुरसने हे पाडव्यानिमित्त आपल्या गावी आले होते. ठाणगावहून मनमाड येथे मोटारसायकलवरून ते मुलगा आणि भावासोबत मनमाडकडे जात होते. त्यावेळी मोटार सायकलला अज्ञात वाहनानं धडक दिली. या धडकेत सागर खुरसने यांचा जागीच मृत्यू झाला. तर, भाऊ आणि मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
या घटनेनंतर संपूर्ण येवला शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुट्टीवर आलेला जवानाचा अपघाती मृत्यू झाल्यानं नियती किती क्रूर असते याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे.
VIDEO: सुयज विखेंची अनोखी गुढी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरातून नववर्षाला सुरूवात