मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /हेडफोन कानात घालून रूळ ओलांडणे तरुणाच्या जीवावर बेतलं, धडक इतकी भीषण की दोन्ही पाय....

हेडफोन कानात घालून रूळ ओलांडणे तरुणाच्या जीवावर बेतलं, धडक इतकी भीषण की दोन्ही पाय....

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

तरुण कानात हेडफोन घालून रूळ ओलांडत असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अपघातस्थळी मोबाईल आणि हेडफोन आढळून आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

पंढरपूर, 28 मार्च : पंढरपूरमध्ये रेल्वेची धडक बसून तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मोबाईलवरील गाणी हेडफोन लावून ऐकणं तरुणाच्या जीवावर बेतलं. घटनेनंतर पोलिसांनी पचंनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाजवळ रेल्वे रूळ ओलांडताना तरुणाला रेल्वेची धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की तरुणाचे पाय तुटून इतरत्र पडले होते. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव जयेश जाधव असं होतं. पंढरपूर मधील जयेश जाधव याचा ट्रकवर मोबाईलला हेडफोन लावून जाताना अपघात झाल्याची प्राथमिक माहिती.

मिरज : सिव्हिलमध्ये रुग्णाला मृत घोषित केल्यानं भाऊ चिडला, डॉक्टरांवरच केला हल्ला

तरुण कानात हेडफोन घालून रूळ ओलांडत असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अपघातस्थळी मोबाईल आणि हेडफोन आढळून आला आहे. या अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. तर अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

लिंगाणा किल्ल्यावर चक्कर आली, ट्रेकर 400 फूट खोल दरीत कोसळला

ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकाचा लिंगाणा किल्ल्यावर दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. पनवेल-मुंबईतील ग्रुप ट्रेकिंगसाठी गेला होता. तेव्हा अजय काळे हे दरीत कोसळले. खोल दरीत पडल्यानं काळे यांचा मृत्यू झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, लिंगाणा  किल्ल्यावर ट्रेकिंग करण्यासाठी पनवेल मुंबई येथील ग्रुप गेला होता. त्यात अजय काळे वय वर्ष ६२ हेसुद्धा होते. खोलदरीत पडल्याने काळे यांचा मृत्यू झाला. किल्ले लिंगाणा हा रायगड जिल्ह्याच्या हद्दीत असला तरी या किल्ल्यावर जाण्यासाठी वेल्हे तालुक्यातून सिंगापूरकडून मार्ग आहे.

First published:
top videos

    Tags: Accident, Pandharpur, Solapur