मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Solapur : महिलांना 8 प्रकारचं व्यवसायिक शिक्षण मिळणार मोफत, 'या' पद्धतीनं करा अर्ज

Solapur : महिलांना 8 प्रकारचं व्यवसायिक शिक्षण मिळणार मोफत, 'या' पद्धतीनं करा अर्ज

X
सोलापूर

सोलापूर महापालिकेतील महिला व बालकल्याण विभागातर्फे 8 प्रकारचे मोफत प्रशिक्षण शिबिर राबविण्यात येणार आहे.

सोलापूर महापालिकेतील महिला व बालकल्याण विभागातर्फे 8 प्रकारचे मोफत प्रशिक्षण शिबिर राबविण्यात येणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur [Sholapur], India

सोलापूर 11 नोव्हेंबर : महिलांनी कॉम्प्युटर संदर्भातील आणि लघुउद्योगासंदर्भात स्वयंशील बनावे आणि त्यातील सर्व तांत्रिक बाबी जाणून घ्याव्यात या उद्देशाने दरवर्षी सोलापूर महापालिकेतील महिला बालकल्याण विभाग विविध व्यवसायिक प्रशिक्षण शिबिर राबत असते. यंदाच्या वेळी विविधप्रकारचे मोफत प्रशिक्षण शिबिर महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणार आहे. पालिकेची सर्व यंत्रणा सध्या ऑनलाईन उपलब्ध होत असून या प्रशिक्षण शिबिरासाठी महिलांना ऑनलाईन पद्धतीनेच 15 नोव्हेंबर पर्यंत अर्ज दाखल करावेत, असं आवाहन महापालिका महिला व बालकल्याण समितीचे अधिकारी विठ्ठल कस्तुरे यांनी केले आहे.

मागील काही योजनांमध्ये महापालिकेच्या वेबसाईटवर काही तांत्रिक अडचण असल्याने अर्ज किंवा जन्म मृत्यूची नोंद तसेच विवाह नोंदणीसाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. परंतु आता वेबसाईटवरून आपल्याला थेट अर्ज दाखल करता येणार आहे. 15 नोव्हेंबर पर्यंत या प्रशिक्षण शिबिरासाठी अर्ज भरता येणार आहेमहापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या आदेशानुसार उपायुक्त विद्या पोळ आणि नियंत्रण अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सोलापूरकरांनो रेल्वेप्रवास करण्यापूर्वी ‘हे’ वाचाच, पुढच्या विकेंडच्या वेळापत्रकात आहेत मोठे बदल

यासाठी 14 ते 45 वर्ष वयोमर्यादा आहे. साधारणपणे 3 महिन्याच्या कालावधीचे हे कोर्स असणार आहेत. पिवळे केसरी कार्ड असणाऱ्या महिला मुलींना यासाठी ऑनलाइन अर्ज करता येईलशैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड, आधार कार्ड, फोटो सोबत अपलोड करणे आवश्यक आहेपात्र महिला मुलींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या www.solapurcorporation.gov.in 17 नोव्हेंबर 2022 पर्यंत पात्र - अपात्र अर्जदारांची यादी महापालिकेच्या याच संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात येईल, तरी इच्छुक पात्र महिला मुलींनी ऑनलाईन अर्ज करावेत. 

 दरवर्षी सोलापूर महापालिकेतील महिला बालकल्याण विभागातर्फे विशिष्ट प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत असते. यंदाच्या वेळी विविधप्रकारच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सर्व महिलांनी लवकरात लवकर सोलापूर महापालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून माहिती मिळवावी आणि आपले अर्ज दाखल करावेत. जर कुणाला या संबंधित योजनेविषयी काही शंका असेल तर त्यांनी सोलापूर महापालिकेतील महिला बालकल्याण विभागाला संपर्क साधावा, असं सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत यांनी सांगितलं आहे. 

विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्याचा गोल्डन चान्स, सोलापूर विद्यापीठ काढणार स्टार्टअप यात्रा

हे 8 प्रकारचे कोर्सेस आहेत

-एम एस सी आय टी

- टॅली

-बँकिंग संदर्भातील दोन कोर्स

-सोलर पावर सिस्टिम

-लेडीज टेलरिंग

- ब्युटी पार्लर

- मार्शल आर्ट कराटे

अधिक माहिती साठी संपर्क क्रमांक 

विठ्ठल कस्तुरे -98605 11873

First published:

Tags: Local18, Solapur