मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Solapur : मध्य रेल्वेकडून ख्रिसमस गिफ्ट, विशेष अजमेर रेल्वे सुरू

Solapur : मध्य रेल्वेकडून ख्रिसमस गिफ्ट, विशेष अजमेर रेल्वे सुरू

मध्य रेल्वेने सोलापूर-अजमेरदरम्यान साप्ताहिक हिवाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेने सोलापूर-अजमेरदरम्यान साप्ताहिक हिवाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेने सोलापूर-अजमेरदरम्यान साप्ताहिक हिवाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

 • Local18
 • Last Updated :
 • Solapur, India

  सोलापूर, 23 डिसेंबर : ख्रिसमस निमित्ताने रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी घेऊन मध्य रेल्वेने सोलापूर-अजमेरदरम्यान साप्ताहिक हिवाळी विशेष  चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोलापूर-अजमेर गाडी क्रमांक 09628 ही साप्ताहिक हिवाळी विशेष एक्सप्रेस 29 डिसेंबर 2022 ते 26 जानेवारी 2023 या कालावधीत दर गुरुवारी दुपारी 12.50 वाजता सोलापूर येथून सुटेल आणि अजमेर येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5.05 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 09627 विशेष एक्स्प्रेस 28 डिसेंबर 2022 ते 25 जानेवारी 2023 या कालावधीत अजमेर येथून दर बुधवारी सकाळी 9 वाजता सुटेल आणि सोलापूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 11.30 वाजता पोहोचेल.

  या दोन्ही एक्स्प्रेस कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, वडोदरा जंक्शन, रतलाम, नागदा जंक्शन, कोटा, सवाई माधोपूर जंक्शन आणि जयपूर जंक्शन थांबणार आहेत. सोलापूर येथील प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने ही विशेष एक्सप्रेस सुरू केली आहे. अजमेर-सोलापूर आणि सोलापूर-अजमेर या दोन्ही ट्रेन साप्ताहिक असल्याने 26 जानेवारीपर्यंत महिनाभरात त्यांच्या अपडाऊन अशा प्रकारच्या पाच ट्रिप होतील. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता प्रवाशांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने घालून दिलेल्या कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या सोलापूर विभागातून करण्यात आले आहे.

  Solapur : पशुसंवर्धन विभागातील योजनांचा घ्या फायदा, लगेच करा अर्ज

  अशी आहे डब्यांची रचना

  गार्ड क्रम लगेज -2, वातानुकूलीत द्वितीय श्रेणी- 02, वातानुकूलीत तृतीय श्रेणी-05, शयनयान- 07, जनरल – 04 एकूण 20 कोच असतील.

   रिझर्वेशन कसे बुक कराल?

  विशेष गाडी क्रमांक 09627/09628 साठी विशेष शुल्कासह बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू आहे.

  विशेष स्थानकावर थांबा तिकीट काढण्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in या वेबसाईटला भेट द्या. किंवा NTES ॲप द्वारे आपले टिकिट बुक करा.

  First published:

  Tags: Local18, Railway, Solapur