मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /एकनाथ शिंदेंच्याच मंत्र्यांना कोण अडचणीत आणतंय? सुषमा अंधारेंनी सांगितली Inside Story

एकनाथ शिंदेंच्याच मंत्र्यांना कोण अडचणीत आणतंय? सुषमा अंधारेंनी सांगितली Inside Story

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या सोलापूरमध्ये सभा घेण्यासाठी आल्या आहेत. या सभेआधी सुषमा अंधारे यांनी भाजप तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या सोलापूरमध्ये सभा घेण्यासाठी आल्या आहेत. या सभेआधी सुषमा अंधारे यांनी भाजप तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या सोलापूरमध्ये सभा घेण्यासाठी आल्या आहेत. या सभेआधी सुषमा अंधारे यांनी भाजप तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

सोलापूर, 27 डिसेंबर : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या सोलापूरमध्ये सभा घेण्यासाठी आल्या आहेत. या सभेआधी सुषमा अंधारे यांनी भाजप तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांना कोण अडचणीत आणतंय? याबाबतही त्यांनी मोठा दावा केला आहे. 'देवेंद्र फडणवीस यांनी शिळ्या कढीला ऊत आणू नये. सुषमा अंधारे पेड कार्यक्रम करते, पण राज्य सरकारला विचारलेले प्रश्न चुकीचे आहेत का?,' असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.

'भाजपकडून दोन एकनाथांना न्याय देताना फरक केला जात आहे. एकनाथ खडसेंना वेगळा न्याय आणि एकनाथ शिंदेंना वेगळा न्याय, याच्यावर काही बोलत नाही,' असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला.

'आज चार मंत्री अनेक प्रकरणांमध्ये अडचणीत आले आहेत, हे चारही मंत्री शिंदे गटातील आहेत. भाजप पद्धतशीरपणे शिंदे यांना अडचणीत आणत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं होतं, फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं आहे, त्याच पद्धतीने पद्धतशीरपणे कटकारस्थान केलं जात आहे,' असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

कोण कोण अडचणीत?

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना नागपूरच्या भुखंडावरून अडचणीत आणलं आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर काल म्हणजेच सोमवारी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन घोटाळा केल्याचा आरोप झाला. तसंच सत्तार यांच्या विधानसभा मतदार संघात सिल्लोड महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मात्र हा महोत्सव कृषीखात्यातील अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरलाय. महोत्सवासाठी 15 कोटी रुपयांचा निधी गोळा करण्याचं टार्गेट कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.

शिंदे, सत्तार, राठोडांनंतर आता ठाकरेंच्या निशाण्यावर आणखी एक मंत्री; काय आहे प्रकरण?

दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील आणखी एक मंत्री दादा भुसे हेदेखील वादात सापडले आहेत. तरुणाला अश्लिल भाषेत शिवीगाळ करतानाचा आणि मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर अधिवेशनातच आणखी एक मंत्री शंभुराज देसाई यांच्यावरही आरोप झाले.

दादा भुसे अडचणीत? तरुणांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारल्याचा व्हिडिओ व्हायरल

First published: