सोलापूर, 22 डिसेंबर : एमबीआर जुळे सोलापूर एसएसआर येथे स्मार्ट सिटी अंतर्गत स्काडा प्रणालीकरिता मीटर व व्हॉल्व्ह बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पाइपलाइनमधील पाणीपुरवठा बंद करण्यात याला आहे. शहरात आज 22 डिसेंबर आणि उद्या 23 डिसेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी 2 दिवस पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांनी केले आहे.
सोलापूरला महापालिकेच्या वतीने 3 दिवसाआड किंवा 4 दिवसाआड अशाप्रकारे पाणीपुरवठा केला जातो. त्यात 2 दिवस आणखी भर पडली आहे. सध्या जुळे सोलापूर विभागातुन या स्काडा प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई-पुण्याच्या धर्तीवर सोलापुरातही ही प्रणाली पालिका प्रशासन राबवत आहे. या माध्यमातून नागरिकांनी आपल्या खाजगी स्वरूपातील जोडलेल्या नळ कनेक्शन मधून पाण्याचा किती वापर केला आहे, हे या प्रणालीमुळे समजणार आहे. दर महिन्याला त्याचे रीडिंग घेऊन संबंधितांना तेवढा पाणीपट्टी कर महापालिकेला भरावा लागणार आहे. या प्रणालीमुळे महापालिकेच्या पाणीपट्टी कर उत्पन्नात भर पडणार आहे.
सोलापूरमध्ये रंगणार चक्क मीम्सची स्पर्धा! या पद्धतीनं व्हा सहभागी
नवीन वर्षात स्काडा प्रणालीमुळे उजनी उपसा सिंचन आणि समांतर जलवाहिनी जोडणी यामुळे शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. सध्या याचे काम सुरु आहे. त्यामुळे आज आणि उद्या शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असं अभियंता संजय धनशेट्टी यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Solapur, Watersupply पाणीपुरवठा