मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Vande Bharat Express Train : वंदे भारत एक्स्प्रेस राज्यात सुपरहिट, महिनाभरातच प्रवासी संख्येचा विक्रम

Vande Bharat Express Train : वंदे भारत एक्स्प्रेस राज्यात सुपरहिट, महिनाभरातच प्रवासी संख्येचा विक्रम

Vande Bharat Express Train : वंदे भारत एक्स्प्रेसला पहिल्याच महिन्यात प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.

Vande Bharat Express Train : वंदे भारत एक्स्प्रेसला पहिल्याच महिन्यात प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.

Vande Bharat Express Train : वंदे भारत एक्स्प्रेसला पहिल्याच महिन्यात प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Mumbai, India

  धनंजय दळवी, प्रतिनिधी

  मुंबई, 26 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील महिन्यात राज्यातील 2 वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता. त्यानंतर मुंबई- साईनगर शिर्डी आणि मुंबई-सोलापूर या दोन गाड्या सुरू झाल्या. या मार्गावरील अन्य रेल्वेंपेक्षा 'वंदे भारत'ला भाडं जास्त आहे. त्यामुळे प्रवाशांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण, गेल्या महिनाभरातील आकडेवारीनुसार ही एक्स्प्रेस राज्यात सुपरहिट ठरली आहे.

  किती जमा झाला महसूल?

  मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी या वंदेभारत एक्स्प्रेसनं 32 दिवसांच्या कालावधीमध्ये 1,00,259 प्रवाशांची वाहतूक केलीय. या गाड्यांनी आत्तापर्यंत 8 कोटी 60 लाखांचा महसूल रेल्वेच्या खात्यात जमा केला आहे.  मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डुवाडी येथील प्रवासी संख्येतून 2.7 कोटी रुपयांचा महसूल मिळवलाय. सोलापूर - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसने सोलापूर, कुर्डूवाडी आणि पुणे येथील प्रवासी संख्येतून  2.23  कोटींचा महसूल प्राप्त केला आहे.

  मुंबई - साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि नाशिक रोड येथील  प्रवाशांच्या संख्येतून 2.05 कोटी रुपयांची महसूलाची नोंद केली. साईनगर शिर्डी - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसने साईनगर शिर्डी आणि नाशिकरोड येथील प्रवासी संख्येतून  2.25 कोटी महसूलाची कमाई केलीय.

  'वंदे भारत' मध्येही लातूर पॅटर्न, देशभरातील ट्रेनची होणार निर्मिती, Video

  वंदे भारत ट्रेनमध्ये ऑन-बोर्ड वाय-फाय इन्फोटेनमेंट, GPS आधारित प्रवासी माहिती प्रणाली, प्लश इंटिरियर्स, टच फ्री सुविधांसह बायो-व्हॅक्यूम टॉयलेट्स, डिफ्यूज्ड एलईडी लाइटिंग, प्रत्येक सीटच्या खाली चार्जिंग पॉइंट्स, वैयक्तिक टच-आधारित वाचन दिवे आणि लपविलेले रोलर पट्ट्या (concealed roller blindsblinds) यासारख्या उत्कृष्ट प्रवासी सुविधा आहेत.

  Vande Bharat Train : मुंबई-सोलापूर गाडीचा वेग कधी वाढणार? रेल्वेनं दिली मोठी माहिती, Video

  जंतूमुक्त हवेच्या पुरवठ्यासाठी यामध्ये अतिनील दिव्यासह उत्तम उष्णता वायुवीजन आणि वातानुकूलित यंत्रणा आहे. इंटेलिजेंट एअर कंडिशनिंग सिस्टीम हवामानाच्या परिस्थितीनुसार/ उपलब्ध संख्येनुसार कूलिंग कार्यरत. या आरामदायी सुविधांमुळेच प्रवाशांचा या गाड्यांना प्रतिसाद मिळत आहे.

  First published:
  top videos

   Tags: Indian railway, Local18, Mumbai, Vande Bharat Express