सोलापूर, 17 जानेवारी : परीक्षेचं वेळापत्रक जाहीर होताच विद्यार्थी संघटनांनी आंदोलन करणे हा आता सोलापूरमध्ये पॅटर्न झाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांचं वेळापत्रक मागच्या आठवड्यात जाहीर झालं आहे. त्यानंतर लगेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेनं या तारखांच्या संदर्भात विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या गेटसमोर आंदोलन केलं. या आंदोलनानंतर विद्यापीठानं परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केलाय.
काय आहे नेमकी मागणी ?
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अभियांत्रिकीच्या आणि Graduate Aptitude Test in Engineering (GATE) या दोन्ही परीक्षा एकाच काळात असल्यामुळे आपल्या विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या आणि तृतीय वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या.
-नवीन परीक्षा वेळापत्रकात प्रत्येक पेपर नंतर एक ते दोन दिवसाचे अंतर असावे.
-कला, वाणिज्य व विज्ञान च्या प्रथम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात
- विद्यार्थ्यांचे ऑनलाईन रिझल्ट लवकरात लवकर लावले जावेत.
- लॉ च्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय विद्यापीठाने घ्यावे.
- आपल्या कामाचा प्रशासकीय दर्जा सुधारावा.
क्या बात है! विद्यार्थ्यांनी तयार केलेली 150 सॅटेलाईट अवकाशात झेपवणार, Video
विद्यापीठाच्या कारभाराला सर्वस्वी कुलगुरू जबाबदार आहेत. कोणत्याही विद्यापीठाच्या परीक्षेच्या संदर्भात वेळापत्रक नियोजन समिती ही चाळीस दिवसांपासून त्यावर काम करत असते परंतु आपल्या विद्यापीठात तशी कोणतीच व्यवस्था नसल्याचे दरवेळी लक्षात येते. त्यामुळे आमच्या अनेक मागण्या घेऊन आम्ही हे आंदोलन करीत आहोत आमच्या अजूनही मागण्या मान्य नाही झाल्या तर आणखी आंदोलन करू, असा इशारा आभाविपच्या रोहित राऊत यांनी दिला.
विद्यापीठाकडून मागण्या मान्य
'आम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या. यामध्ये अभियांत्रिकीच्या परीक्षा 25 जानेवारीपासून सुरू होईल. प्रत्येक पेपरमध्ये तीन दिवसांचा वेळ असेल, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या परीक्षा 23 जानेवारी पासून असतील असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे संचालक प्रा . गणपुरे यांनी 'न्यूज 18 लोकमत'शी बोलताना सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.