सोलापूर 27 जानेवारी : सोलापूर शहरातल्या कापड गिरण्यात या एकेकाळी जगप्रसिद्ध होत्या. टेक्स्टाईल व्यवसाय करणे हे सोलापुरात प्रतिष्ठेचे मानले जात असे. काळानुसार या कापड गिरण्या बंद झाल्या. त्याचा सोलापूरकरांना मोठा फटका बसला. अनेक जण बेरोजगार झाले. शेतीच्या खालोखाल सर्वात जास्त उत्पन्न देणारं क्षेत्र म्हणून टेक्सटाईलची ओळख आहे. सोलापूर पुन्हा एकदा टेक्स्टाईल हब व्हावं यासाठी तेथील उद्योगांच्या आगामी बजेटपासून काय अपेक्षा आहेत ते पाहूया.
टेक्स्टाईल उद्योगाच्या मागण्या
- उद्योगांचा विचार करून वीज बिलाच्या संदर्भात योग्य तरतुदी कराव्यात. थकित बिलावर काही सूट जाहीर करावी किंवा त्या संदर्भात विशेष असे आर्थिक धोरण आखावे.
- जीएसटीच्या संदर्भात ऑडिट लिमिट वाढवून व्यापाऱ्यांना दिलासा द्या.
-इन्कम टॅक्सच्या संदर्भातली स्लॅबमध्ये काही ठोस असे निर्णय घ्यावे
Union Budget 2023 : औरंगाबादच्या रेल्वे प्रवाशांना बजेटपासून काय हवं?
-इन्कम टॅक्स आणि एक्सपेंडिचर टॅक्स यांच्यामधील असणारी तफावत तपासून योग्य कर आकारला तर सर्व गोष्टी सोयीस्कर होतील.
-टेक्स्टाईलच्या संदर्भात कॅपिटल इन्वेस्टमेंट वाढवून प्रत्येक योजना अधिक सोपी करावी. त्याचबरोबर त्याला मुदतवाढ द्यावी.
-सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही अधिक बळकट केली तर छोटे शहर आणि मोठे शहर यांच्याशी संलग्नित असणारे नागरिक व्यापारी बाजाराकडे वळतील. त्यामधून टेक्स्टाईल विभागाला आणखी बळकटी मिळेल.
टेक्स्टाईल इंडस्ट्री म्हणजे सोलापूरचा आत्मा आहे. त्यावर अनेक जणांचे रोजगार अवलंबून आहेत. केंद्र सरकारनं कामगारांच्या संदर्भात आणि टेक्सटाईल विभागाच्या अंतर्गत धोरणाविषयी बारकाईनं विचार करावा. सरकारच्या मदतीनंच सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगाला बळ मिळेल आणि रोजगाराची संधी वाढेल, असं मत सोलापूरच्या चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी व्यक्त केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Budget 2023, Local18, Solapur