मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /रथाचं चाक निखळलं अन् दोघांच्या थेट अंगावर; वागदरी परमेश्वर यात्रेला गालबोट

रथाचं चाक निखळलं अन् दोघांच्या थेट अंगावर; वागदरी परमेश्वर यात्रेला गालबोट

वागदरी परमेश्वर यात्रेला गालबोट

वागदरी परमेश्वर यात्रेला गालबोट

वागदरीचे ग्रामदैवत श्री परमेश्वराच्या यात्रेमध्ये रथ ओढण्याची परंपरा आहे. याच रथाच्या चाकाखाली आल्यामुळे दोघा जणांचा जागीच मृत्यू प्राथमिक माहिती आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

सोलापूर, 26 मार्च : जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे परमेश्वर यात्रेला गालबोट लागले आहे. अक्कलकोट शहरापासून वागदरी येथील ग्रामदैवत परमेश्वर यात्रा उत्सव काळात ठेर (रथ) ओढणे हा धार्मिक कार्यक्रम सुरू होता. त्यामध्ये अचानकपणे रथाच्या चाकाचा पार निसटल्याने दुर्घटना होवून दोघे भाविक गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर काही तासातच त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्री घडली. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. दरम्यान, या अपघातानंतर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कशी घडली घटना?

परमेश्वर मंदिर ते बसस्थानक भागापर्यंत असंख्य भाविक हा रथ ओढतात. साधारणपणे 12 फूट रुंद असलेल्या या रथाला दगडी चाके आहेत. रथ ओढत असताना अचानक एका बाजूचे चाक निखळले आणि दोन भाविकांच्या अंगावरुन गेले. या दुर्घटनेत जखमी झालेल्या पैकी संजय नंदे, गंगाराम गाडीवर हे सद्भक्त गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर वागदरी येथील परमेश्वर यात्रा उत्सवातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

या यात्रेत दुर्घटना घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही यात्रा मोठ्या उत्साहात होत असते. मात्र यंदा या दुर्घटनेचे गालबोट लागल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

First published:
top videos

    Tags: Solapur