मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Solapur : डिलिव्हरीचा मोठा खर्च वाचवण्यासाठी 'ही'हॉस्पिटल ठरतायत वरदान, Video

Solapur : डिलिव्हरीचा मोठा खर्च वाचवण्यासाठी 'ही'हॉस्पिटल ठरतायत वरदान, Video

X
खासगी

खासगी हॉस्पिटलमध्ये सिझर डिलेव्हरीचं प्रमाण मोठं असताना सरकारी हॉस्पिटलमधून एक महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे

खासगी हॉस्पिटलमध्ये सिझर डिलेव्हरीचं प्रमाण मोठं असताना सरकारी हॉस्पिटलमधून एक महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

सोलापूर 19 जानेवारी : महिलांना प्रसुतीच्या दरम्यान अनेकदा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. सोलापूर शहराच्या अंतर्गत जवळपास 180 पेक्षा जास्त खासगी प्रसुतीगृहांची सोय असलेली हॉस्पिटल आहेत. यामध्ये अर्थातच खासगी हॉस्पिटलची संख्या जास्त आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये सिझर डिलेव्हरीचं प्रमाण मोठं असताना सरकारी हॉस्पिटलमधून एक महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे.

सोलापूर शहरात आठ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्रात महिलांना डिलेव्हरीसाठी देण्यात येणाऱ्या गोळ्या-औषधांचा खर्च सोडला तर सर्व इलाज हा मोफत केला जातो.  खासगी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात बिल येत असल्यानं सामान्य रूग्णांसाठी ही आरोग्य केंद्र मोठा आधार ठरली आहेत.

काय आहे आकडेवारी?

1 एप्रिल 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत एकूण 58572 महिलांनी सरकारी प्रसुतीगृहाच्या ओपीडीचा तर 8747 महिलांनी आयपीडीचा लाभ घेतला. त्यापैकी आठ प्रसुतीगृहात बिन टाका नसबंदी, टाक्याची नसबंदी, तांबी आणि इतर शस्त्रक्रिया झालेल्या महिलांची संख्या 8747 आहे. 2521 महिलांची नॉर्मल डिलिव्हरी झाली असून फक्त 52 महिलांची मागील वर्षभरात सिझेरियन डिलिव्हरी झाली आहे.

Video : सांगलीत बालविवाहाचं प्रमाण वाढलं, अल्पवयीन मुलींबाबत धक्कादायक वास्तव उघड

सिझेरियन पद्धत कधी वापरावी?

आई किंवा गर्भाच्या जीवाला धोका असतो तेव्हाच सिझेरियनची शिफारस केली जाते. मात्र, ही पद्धत सध्या प्रसूती वेदनांपासून सुटका करण्याचा मार्ग बनली आहे. योनीमार्गे प्रसूतीपेक्षा सिझेरियन प्रसूती कमी वेदनादायी, सुरक्षित आणि आरोग्यदायी असते असा लोकांचा सामान्य समज आहे.

'आम्ही 99 टक्के डिलिव्हरी या नॉर्मल स्वरूपात करण्याचा प्रयत्न करतो. खासगी हॉस्पिटलमध्ये 40 ते 50 टक्के डिलिव्हरी या सिझेरियन पद्धतीनं करतात. त्यामुळे त्यांचा आर्थिक फायदा होतो. कुणाला मोफत नॉर्मल डिलिव्हरी करायची असेल तर शहरातील आठ सरकारी प्रसुतीगृहांचा लाभ घ्यावा, अशी प्रतिक्रिया डफरीन प्रसुतीगृहाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर सोडल यांनी दिली.

First published:

Tags: Health, Local18, Solapur