मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'कुणी मुली देईना, लग्न होईना', घोड्यावर बसून तरुणांनी काढला 'नवरदेव मोर्चा', सोलापूरकर पडले बुचकळ्यात VIDEO

'कुणी मुली देईना, लग्न होईना', घोड्यावर बसून तरुणांनी काढला 'नवरदेव मोर्चा', सोलापूरकर पडले बुचकळ्यात VIDEO


या मोर्चामध्ये चक्क नवरदेवाच्या वेशावत घोड्यावर बसून तरुण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले होते.

या मोर्चामध्ये चक्क नवरदेवाच्या वेशावत घोड्यावर बसून तरुण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले होते.

या मोर्चामध्ये चक्क नवरदेवाच्या वेशावत घोड्यावर बसून तरुण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

प्रितम पंडित, प्रतिनिधी

सोलापूर, 21 डिसेंबर : विविध मागण्या आणि एखाद्या घटनेचा निषेध करण्यासाठी मोर्चा आणि आंदोलन केली जात असतात. पण, आज सोलापूरमध्ये एक वेगळाच मोर्चा पाहण्यास मिळाला. लग्न होत नाही, मुली कुणी देत नाही म्हणून अविवाहित तरुणांनी चक्क जिल्ह्याधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे.

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे वेगवेगळ्या संघटना आपल्या मागण्यासाठी मोर्च काढत आहे. पण, सोलापूरमध्ये अविवाहित तरुणांनी वेगळ्याच मागणीसाठी मोर्चा काढला.

मोहोळ येथील राष्ट्रवादीचे नेते रमेश बारसकर यांच्या नेतृत्वात हा अनोखा मोर्चा निघाला होता. होम मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर घोड्यावर बसून नवरदेव रवाना झाले होते.

(अन् सभागृहात भुजबळांनी मफलर पुढे करून भीक मागितली, फडणवीसांनी काढले प्रबोधनकारांचे पुस्तक!)

या मोर्चामध्ये चक्क नवरदेवाच्या वेशावत घोड्यावर बसून तरुण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. बँड बाजा लावून या तरुणाचा मोर्चा निघाला होता. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येनं नवरदेव कुठे चालले यामुळे लोकही बुचकळ्यात पडले होते. अखेर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला.

(… तिच्या जागी पोलीस आले आणि रोडरोमियोची उडाली धांदल! पाहा, Video)

वय उलटून गेले तरी केवळ मुली मिळत नसल्याचं म्हणणं या तरुणांनी मांडलं. राज्य सरकारने गर्भलिंग निदान चाचणी बंद केली पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, आज 100 मागे 10 ते 12 मुलं लग्नाची राहिलेली आहेत. 5 वर्षानं वाढेल 15 ते 20 होतील. ही परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे राज्य सरकारने याचा विचार करावा, अशी मागणी या तरुणांनी केली आहे.

First published: