मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /गुजरातला गेलेल्या वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत रोहित पवारांचं मोठ विधान, म्हणाले...

गुजरातला गेलेल्या वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत रोहित पवारांचं मोठ विधान, म्हणाले...

फॉक्सकॉन वेदांतांमध्ये जे गुंतवणूक करणाऱ्या संस्थाचं म्हणणं आहे की, महाराष्ट्रात प्रकल्प असेल तरच गुंतवणूक करू

फॉक्सकॉन वेदांतांमध्ये जे गुंतवणूक करणाऱ्या संस्थाचं म्हणणं आहे की, महाराष्ट्रात प्रकल्प असेल तरच गुंतवणूक करू

फॉक्सकॉन वेदांतांमध्ये जे गुंतवणूक करणाऱ्या संस्थाचं म्हणणं आहे की, महाराष्ट्रात प्रकल्प असेल तरच गुंतवणूक करू

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur [Sholapur], India

प्रितम पंडित, प्रतिनिधी

सोलापूर, 07 फेब्रुवारी : महाराष्ट्रातून वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. पण, महाराष्ट्रातून हे प्रकल्प गुजरातला गेले असले तरी अजूनही त्यांना जागा मिळालेली नाही, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

'समृद्ध महाराष्ट्राचा आवाज व्हा' या महाराष्ट्र व्हिजन फोरम या कार्यक्रमाद्वारे रोहित पवार यांनी वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना थेट उत्तरं दिली.

यावेळी वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणावर रोहित पवार यांनी मोठे विधान केलं. 'महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्पाला अद्यापही गुजरातमध्ये जमीन मिळालेली नाही. फॉक्सकॉन वेदांतांमध्ये जे गुंतवणूक करणाऱ्या संस्थाचं म्हणणं आहे की, महाराष्ट्रात प्रकल्प असेल तरच गुंतवणूक करू. अजूनही वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात येऊ शकतो. त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पुढाकार घ्यायला हवा' असंही रोहित पवार म्हणाले.

(तुम्ही काय मला मुर्ख समजता का? अजित पवार 'त्या' प्रश्नावर भडकले, VIDEO)

अभ्यास, शिक्षण, व्यवसाय आणि राजकारण कोणीही लादले नाही. यातला सर्व निर्णय माझा होता कोणीही तो लादला नाही. महाराष्ट्र आणि देशाविरोधात किंवा महापुरुष तसेच संतांच्या विरोधात कोणी बोलले तर विरोध करायचा फक्त डोके नका फोडू, असंही रोहित पवार म्हणाले.

कॉलेजमध्ये असताना मला एकदा तरी लव्हलेटर लिहायचा चान्स मिळेल असं वाटत होतं पण ती संधी मिळाली नाही. मी कोणाच्या प्रेमात पडलो नाही आणि कोणी माझ्या प्रेमात पडले नाही. माझ्या आयुष्यातला पहिलं आणि शेवटचं प्रेम माझी बायको आहे, रोहित पवार यांनी असा खुलासा करताच विद्यार्थ्यांकडून एकच टाळ्या कडकडाट झाला.

युवकांमध्ये डिप्रेशनचे प्रमाण अधिक आहे. मी क्रिकेट, जिम, आईवडील, भाऊ बहिणीवर प्रेम करतो. दीपिका पादुकोण सक्सेसफुल आहे. सक्सेसफुल आणि पैसे असतानाही त्या डिप्रेशन गेल्याचे त्यांनी सांगितलं, असंही रोहित पवार यांनी सांगितलं.

(भाजपच्या आवाहनानंतर अजितदादा पोटनिवडणुकीवर ठाम, चिंचवडचे उमेदवार मात्र गॅसवर!)

यावेळी 2024 मध्ये महाराष्ट्रचे cm झालात तर काय कराल? असा प्रश्न तरुणांनी विचारला असता रोहित पवार म्हणाले की, 'मला पहिल्या किंवा शेवटच्या कोणत्याही नंबरला पाठवा. किंवा कॅप्टन किंवा व्हाईस कॅप्टन करा. राजकारणात मी पदाच्या अपेक्षेसाठी आलेलो नाही तर राजकारणाच्या माध्यमातून समाजसाठी माझ्यावर जी जबादारी येईल ती मी पार पाडेल'

प्रश्न : मुलींच्या छेडछाड करतात त्याला काय उत्तर असेल?

रोहित पवार - काही मुलं मुलींना छेडतात त्यांना त्रास देतात त्यावेळी त्या मुलांना फोडाल की नाही फोडाल... फोडले पाहिजे

प्रश्न : आपले राजकारणातील आदर्श कोण आहेत?

रोहित पवार : पवार साहेब आमचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे ते आमचे सर्वांचे मार्गदर्शक आहेत. सुप्रिया ताई पार्लमेंटमध्ये त्या ज्या पद्धतीने प्रश्न मांडतात ती स्टाईल मी आत्मसात करतो. अजित दादा यांच्या कामाची धडाका मी पाहतो. तो धडाका घेण्याचा प्रयत्न करतो. आपले मेंटॅर मोदी साहेब, पवार साहेब किंवा छोटासा ड्रायव्हर सुद्धा होऊ शकतो.

प्रश्न : जिल्हा परिषदेच्या शाळा कमी होत आहेत आणि खाजगी शाळा वाढत आहेत तुम्हाला काय वाटतं?

रोहित पवार : शाळेतील शिक्षकांना अतिरिक्त काम दिले जातं ते कमी करावे लागेल. तुम्ही जिल्हा परिषद शाळा शिकता त्याचा अर्थ तुम्ही कमी आहात असे नाही. सरकारने आजपर्यंत शिक्षणासाठी निधी कमी दिला तो निधी आपल्याला वाढवावा लागेल. शिक्षकांना ताकद देऊन इतर कामे कमी केले पाहिजे. मराठी भाषेत शिक्षण झाले पाहिजे. पण मुलांना इंग्लिश बोलता, लिहिता आले पाहिजे. मुलांना कॉम्प्युटर ही आला पाहिजे याचे नियोजन झाले तर सर्व ठीक होईल. मराठीला सगळा मान दिला पाहिजे.

First published:

Tags: Rohit pawar