मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सोलापूर लवकरच होणार 'सोलारपूर'! नव्या प्रकल्पानं बदलणार शहराचं भविष्य, Video

सोलापूर लवकरच होणार 'सोलारपूर'! नव्या प्रकल्पानं बदलणार शहराचं भविष्य, Video

X
टाटा

टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी या कंपनीतर्फे सोलापुरात 150 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. रोजगाराचा मोठा पर्याय हा प्रकल्प ठरणार आहे.

टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी या कंपनीतर्फे सोलापुरात 150 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. रोजगाराचा मोठा पर्याय हा प्रकल्प ठरणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur [Sholapur], India

सोलापूर, 18 नोव्हेंबर : टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी या कंपनीतर्फे सोलापुरात 150 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. या सौर प्रकल्पाच्या बांधकामासाठी कंपनीला 'लेटर ऑफ ॲवॉर्ड' मिळाले आहे. वीज खरेदी करार कार्यान्वित झाल्यानंतर, प्रकल्प 18 महिन्यांच्या आत सेवेत आणला जाईल. टाटा पॉवरची उपकंपनी असलेल्या टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड (टीपीआरईएल) यांना महाराष्ट्राकडून 'लेटर ऑफ अवॉर्ड' (एलओए) प्राप्त झाला आहे.

राज्य वीज वितरण महामंडळ लिमिटेड सोलापूर येथे हा सौर प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत निर्माण होणारी वीज ही लिलाव प्रक्रियेतून खाजगी , सरकारी किंवा निम्न सरकारी संस्थांना विकण्यात येणार आहे. वीज विक्रीचा प्रती युनिट दर हा स्पर्धात्मक दराशी मिळताजुळता असणार आहे.

Solapur : सोलापूर जिल्ह्यातलं प्लंबरचं गाव, 90 टक्के पुरुष करतात प्लंबिंगचे काम, पाहा Video

सोलापुरातील जे युवक सोलर सिस्टिम शी संलग्नित आहेत. त्यांच्यासाठी रोजगाराचा मोठा पर्याय हा प्रकल्प ठरणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. तसेच हा प्रकल्प येणाऱ्या  काळातील 46 हजार टन इतका कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित होण्यापासून रोखू शकतो. याचाच अर्थ पर कंजम्प्शन 150 मेगावॅट एवढी वीज कृत्रिम पद्धतीने तयार करण्यासाठी 46 हजार टन इतका कार्बन डाय-ऑक्साइड वापरला जातो.

सोलार सिस्टीम मुळे हा उत्सर्जित होणार नाही आणि विजही निर्मित होईल. शिवाय हा कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन रोखल्यामुळे आपण जवळपास 73 हजार इतकी झाडे लावण्यासारखे आहे. त्यामुळे सोलापूरकरांना याचा फायदा व्हावा हीच इच्छा व्यक्त करतो आणि या प्रकल्पाचे स्वागत करतो, असं पावरफ्लो इको सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक गुरुराज कुलकर्णी यांनी सांगितले.

Solapur : सहावीतल्या सोहमचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ पाहून मोठेही होतात थक्क! Video

 वीज खरेदी करार लागू करण्यात आलेल्या तारखेपासून 18 महिन्यांमध्ये हा प्रकल्प सुरू करावा लागणार असल्याचे टीपीआरएलचे सीईओ आशीष खन्ना यांनी सांगितले आहे. या प्रकल्पामुळे आता टीपीआरएलची एकूण अपारंपरिक ऊर्जा क्षमता 5786 मेगावॅटवर पोहोचणार आहे.

 

First published:

Tags: Local18, Solapur