सोलापूर, 25 जानेवारी : म्हैसूर-सोलापूर-म्हैसूर मार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता गाडी क्र. 16535/16536 (म्हैसूर – सोलापूर-म्हैसूर) एक्सप्रेसच्या कोच संरचनेत बदल करण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या सोलापूर आणि दक्षिण पश्चिम रेल्वेच्या म्हैसूर विभागाच्या वतीने घेण्यात आला होता. मात्र, हा निर्णय 2 दिवसामध्ये बदलण्यात आला आहे. कोच संरचनेत कोणते ही बदल होणार नाहीत, असं रेल्वेच्या सोलापूर आणि म्हैसूर विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांची निराशा झाली आहे.
म्हैसूर- सोलापूर- म्हैसूर एक्सप्रेस मध्ये कोच संरचनेत दोन स्लीपर डबे कमी करून दोन तृतीय श्रेणी डब्यात वाढविण्याचा निर्णय रेल्वे विभागाकडून घेतला गेला होता. हा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला होता पण हा निर्णय रविवारी बदलण्यात आला आहे. त्यामुळे जनरेटर - 01, एसी 2 टियर- 1, एसी 3 टियर- 3, स्लीपर - 12, जनरल - 03, गार्ड ब्रेकयान - 01 एकूण = 21 अशीच रचना कायम राहणार आहे तरी रिझर्वेशनच्या संदर्भात प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असं सोलापूर आणि म्हैसूर विभागाकडून कळवण्यात आले आहे.
या रुटवरील रेल्वे गाड्यात झाला मोठा बदल, प्रवास करण्यापूर्वी पाहा वेळापत्रक
म्हैसूर-सोलापूर-म्हैसूर एक्सप्रेसमध्ये कोणतेही कोच संदर्भात बदल होणार नाहीत. काही तांत्रिक कारणांमुळे कोच संदर्भातील बदल हा पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी या संदर्भातील सर्वच गोष्टी लक्षात घेऊन म्हैसूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या सर्व सोलापुरी प्रवाशांनी आपला प्रवास सुनिश्चित करावा, असं वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सोलापूर एल. के. रणयेवले यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.