मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /तीन महिन्यांपूर्वी गायब झालेला अल्पवयीन मुलगा सापडला, पण अवस्था पाहून बसला धक्का

तीन महिन्यांपूर्वी गायब झालेला अल्पवयीन मुलगा सापडला, पण अवस्था पाहून बसला धक्का

मागच्या तीन महिन्यांपूर्वी सोलापुरात एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झाले होते. तीन महिन्यांपासून सुरू असलेला शोध अखेर काल थांबला.

मागच्या तीन महिन्यांपूर्वी सोलापुरात एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झाले होते. तीन महिन्यांपासून सुरू असलेला शोध अखेर काल थांबला.

मागच्या तीन महिन्यांपूर्वी सोलापुरात एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झाले होते. तीन महिन्यांपासून सुरू असलेला शोध अखेर काल थांबला.

  • Local18
  • Last Updated :
  • Solapur, India

सोलापूर, 02 एप्रिल : मागच्या तीन महिन्यांपूर्वी सोलापुरात एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झाले होते. तीन महिन्यांपासून सुरू असलेला शोध अखेर काल थांबला. बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव कुणाल असे आहे. तो तेलंगणा येथील एका ठिकाणी सापडल्याची माहिती समोर आली आहे. मोबाईलच्या माध्यमातून त्याचा शोध लागल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आलं. तीन महिन्यांनंतर आईने कुणालला पाहताच भरून आल्याने काही काळ सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलो होते.

मोहोळ तालुक्यात घराजवळ खेळत असलेल्या अकरा वर्षाच्या मुलास गोड बोलून पळून नेल्याची घटना घडली होती. अपहरण झालेल्या अकरा वर्षाच्या मुलाला हॉटेलमध्ये भंगार गोळा करण्याची काम दिले होते. तीन महिन्यांनी मोहोळ पोलिसांनी शोध घेतल्यानंतर अपहरण झालेला मुलगा पुन्हा आईला भेटला आहे. याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मोहोळ पोलिसांनी या मुलाला शोधून काढल्यानंतर परिसरात कौतुक होत आहे.

मोठी बातमी! भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, भर रस्त्यात आरोपींचा अंदाधुंद गोळीबार

11 जानेवारी 2023 रोजी चिंचोली काठी औद्योगिक वसाहतीमधील प्रकाश कुणचकोर यांचा अकरा वर्षाचा नातू हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. मोहोळ पोलिसांनी मुलाचा शोध घेण्यासाठी एक पथकाची स्थापना केली. सदर पथकाने अपहरण झालेल्या मुलासंदर्भात कसून चौकशी केली.

धाराशिव जिल्ह्यातील बुधडा या ठिकाणी जाऊन शोध लोकांकडे विचारणा करून आरोपी, मुलाचा शोध घेतला. त्यानंतर सायबर सेलच्या मदतीने सदर मुलगा हा तेलंगाना राज्यातील विकाराबाद जिल्ह्यात असल्याचे पुढे आले. 

धारदार शस्त्रांनी सपासप वार, राष्ट्रवादीच्या सरपंचाची हत्या, पुण्यात खळबळ

त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता मुलगा आरोपी रंगारेड्डी हा एका हॉटेल, भंगार गोळा करणाऱ्या दुकानात काम करत असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी सदर पीडित मुलगा हा कचऱ्यातील प्लास्टिक बाटल्या गोळा करत असल्याचे दिसून आले.

त्यानंतर सदर आरोपी आणि मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले मोहोळ पोलीस ठाण्यात येताच सदर पीडित मुलाला आईच्या स्वाधीन केले. त्यावेळेस आईला पाहून त्याला गहिवरून आल्याने काही काळ वातावरण भावनीक झाले होते.

First published:
top videos

    Tags: Local18, Solapur, Solapur news