मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सोलापूर : प्रेमीयुगल एकाच झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळले; आत्महत्या की घातपात?

सोलापूर : प्रेमीयुगल एकाच झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळले; आत्महत्या की घातपात?

Solapur: उत्तर सोलापूरमधील कवठे गावात एका झाडाला प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Solapur: उत्तर सोलापूरमधील कवठे गावात एका झाडाला प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Solapur: उत्तर सोलापूरमधील कवठे गावात एका झाडाला प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

प्रीतम पंडित, प्रतिनिधी

सोलापूर, 25 फेब्रुवारी : सोलापूर जिल्ह्यातील कवठे गावात एका झाडाला प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. दोघांचेही मृतदेह खाली उतरवण्यात आले असून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. आत्महत्या की घातपात यावरुन चर्चेला उधाण आलं आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तर सोलापूरमधील कवठे शिवारातील एका लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या आवस्थेत हे जोडपे आढळले. ही घटना तेथील नागरिकांना कळताच त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, त्यांच्या नातेवाईकांशी पोलिस संपर्कसाधत आहेत. घटनास्थळावर कॉलेजची एक बॅग, एक दुचाकी पोलिसांना आढळून आली. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वी मृत घोषित केले.

वाचा - हत्यारे घेऊन जाणारी टोळी जेरबंद, धुळ्यात तब्बल 12 तलवारी जप्त, तर 10 जण जेरबंद

मागच्या महिन्यातच अशीच घटना

पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा जवळील कासारवाडी शिवारात एका प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 6 जानेवारीला उघडकीस आली होती. कृष्णा अशोक करजे (वय 25 रा. मठाचीवाडी, ता.शेवगाव) आणि नेवासा तालुक्यातील एका अलपवयीन मुलीचा यामध्ये समावेश आहे. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव मिरी रस्त्यावर कासारवाडी शिवारात एका पडीक खोलीमध्ये या प्रेमी जोडप्याने प्रेम प्रकरणाच्या कारणातून छताला वायरच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

बारावीत शिकणारी अल्पवयीन मुलगी ही गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेली होती. कुटुंबातील नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही. आज सकाळी मुलीचे वडील हे नेवासा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता मुलीच्या आत्महत्याची घटना कळाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाथर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशल्य राम निरंजन वाघ, पोलीस नाईक सचिन नवगिरे, राहुल तिकोणे आत्महत्या केलेल्या घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतले. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पोलिस पुढील तपास करीत आहेत.

First published:
top videos

    Tags: Solapur, Suicide