प्रीतम पंडित, प्रतिनिधी
सोलापूर, 23 मे : सोलापूर जिल्ह्यात बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पैशासाठी प्रेमविवाहातून जन्मलेल्या अल्पवयीन मुलीला कला केंद्रात पाठविल्यानंतर तिच्यावर केंद्रात आलेल्या चौघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. यात पिता, कला केंद्राचे पाच चालक, 4 ग्राहकांवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
पीडितेच्या आईने आरोपी पतीसोबत 2005 मध्ये प्रेमविवाह केला होता. त्यावेळी त्यांना मुलगी झाली होती. त्यांच्या दोघांत पटेनासे झाल्यामुळे ते दोघे मागील अनेक वर्षांपासून वेगळे राहत होते. त्यानंतर पीडिता ही पित्यासोबत राहत होती. दरम्यान, पंधरा वर्षांच्या पोटच्या मुलीला बापाने चक्क विविध जिल्ह्यांतील कला केंद्रात पाठविल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली होती.
वाचा - माता न तू वैरिणी; आईनेच आपल्या मुलींना देहव्यापारासाठी विकलं, नागपुरात खळबळ
याबाबत पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पित्याने पीडितेला पैशासाठी पुणे, सोलापूर, बारामती या कला केंद्रांत सोपविले. याबदल्यात कलाकेंद्र चालकांकडून त्यांनी पैसे घेतले. या पैशासाठी पीडितेला ग्राहकांसमोर, त्यांच्यासोबत नाचावे लागत होते. शिवाय यावेळी पीडितेला चार ग्राहकांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले.
याबाबत पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पित्यावर तसेच छाया नेर्लेकर (रा. सोलापूर), धोंडराईकर, अनिता वाघोलीकर, मीना पारगावकर (रा. अहमदनगर) यांच्यासह पीडितेवर अत्याचर करणारे अनोळखी अशा चारजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी पित्याला पोलिसांनी अटक केली असून घटनेचा तपास पोलिस करत आहेत.
दोन मित्रांचा बुडून मृत्यू
सोलापूर शहराजवळ असलेल्या तळे हिप्परगा येथील तलावात दोन मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोलापुरात दिवसेंदिवस उष्णता वाढत चालल्याने येथील अनेक नागरिक दुपारच्या सुमारास वॉटरपार्क किंवा तलावात पोहोण्यासाठी जात आहेत. मात्र, पोहायला गेलेल्यांच्या जीवावर बेतलं जात असल्याने अनेकांचा बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढलं आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास तलावाशेजारी राहणाऱ्या नागरिकांना दोन मृतदेह तरंगत असताना दिसले. याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. शासकीय रुग्णालयात असलेले रुग्णसेवक जहांगीर शेख यांनी राज गवळी आणि नागेश बोल्लू या दोघांचे मृतदेह तलावाबाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. नातेवाईकांना ही बाब कळताच त्यांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली. चौघे मित्र गेले होते, मात्र दोघेच परत आले. परत आलेल्या दोघा मित्रांनी सोमवारी सायंकाळीच महिती देणे गरजेचे होते. यामागे संशयास्पद काहीतरी कटकारस्थान आहे का? असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.