मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Solapur : 106 वर्षांच्या आजीला पुन्हा आले दात, घरच्यांनी पाळण्यात बसवून केलं सेलिब्रेशन, Video

Solapur : 106 वर्षांच्या आजीला पुन्हा आले दात, घरच्यांनी पाळण्यात बसवून केलं सेलिब्रेशन, Video

X
Solapur

Solapur : 106 वर्षांच्या आजींना पुन्हा एकदा दात आले आहेत. घरातील मंडळींनी त्या निमित्तानं जोरदार सेलिब्रेशन केले.

Solapur : 106 वर्षांच्या आजींना पुन्हा एकदा दात आले आहेत. घरातील मंडळींनी त्या निमित्तानं जोरदार सेलिब्रेशन केले.

 • Local18
 • Last Updated :
 • Solapur, India

  सोलापूर 24 डिसेंबर :  सर्वांनी पाळणा सजवायला सुरू केला... पाळण्याला फुलांनी आणि चमकीच्या माळांनी सजवले. घरात एखादा सण असावा अशा प्रकारचं उत्साहच वातावरण आणि आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. निमित्तही तसंच होतं. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातल्या चपळगाव येथील धानव्वा उटगे यांना वयाच्या 106 व्या वर्षी दुधाचे दात परत आले. त्याचेच सेलिब्रेशन म्हणून घरातील सर्व मंडळींनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने आजीचा सन्मान केला.

  असा झाला वाढदिवस!

  धानव्वा या चपळगावातील सर्वात वयोवृद्ध महिला आहेत. म्हातारपणात त्वचा सुकते आणि सर्व दात पडतात परंतु विशिष्ट वयानंतर धानवा यांना पुन्हा एकदा दुधाचे दात आल्याने घरातील लोकांनी चक्क पाळणा सजवला. त्यामध्ये आजीला  टोपी आणि फुलांचा हार घालून लहान मुलाप्रमाणे जो बाळा जो जो रे म्हणत ... चक्क बारशाचा कार्यक्रम केला. यावेळी आजीला सर्वांनी उचलून हळुवारपणे पाळण्यात बसवले आणि पाळण्याला झोके दिले.

  नागपूरकरांना मोफत मेजवानी, 5 हजार किलो भाजीचा होणार विश्वविक्रम! Video

  आजकालच्या या फास्ट फुडच्या जीवनात तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच झटपट बनणारे पदार्थ खाण्याकडे सर्वांचा ओढा असतो. अगदी लहान मुलांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होतो.  आपला आहार संतुलित असेल तर शरीरही सुदृढ बनते. खापर पतवडं, पतवंड,  नातवंडं, मुलं आणि सुना अशा आजींच्या कुटुंबातील तब्बल 80 जणांनी मिळून हा वाढदिवस साजरा केला.

  67 वर्षांच्या आजींचा कडक चहा, आरोग्यालाही आहेत अनेक फायदे

  काय आहे आजीचे फिटनेस रहस्य ?

  106 वर्षाच्या धन्नव्वा आजी मागील 40 वर्षांपासून एकदाच जेवतात. त्यांना शाकाहारी जेवण अधिक आवडतं. त्याचबरोबर त्या रोज सकाळी योगा करतात. त्यामुळे त्यांची तब्येत उत्तम आहे, अशी माहिती त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दिली.

  First published:

  Tags: Local18, Solapur