मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Solapur : सहावीतल्या सोहमचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ पाहून मोठेही होतात थक्क! Video

Solapur : सहावीतल्या सोहमचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ पाहून मोठेही होतात थक्क! Video

X
सहावीमध्ये

सहावीमध्ये शिकणार्‍या सोहमचे वक्तृत्व, त्यांची मिमिक्री आणि त्यांचा हा बोलक्या बाहुल्यांचा खेळ कौतुकाचा विषय बनला आहे.

सहावीमध्ये शिकणार्‍या सोहमचे वक्तृत्व, त्यांची मिमिक्री आणि त्यांचा हा बोलक्या बाहुल्यांचा खेळ कौतुकाचा विषय बनला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

सोलापूर, 15 नोव्हेंबर : आपण सर्वांनी लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांचा झपाटलेला हा मराठी चित्रपट पाहिला असेल. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे बोलक्या बाहुल्यांचा खेळ हा सर्वांचेच लक्ष वेधणारा होताहाच चित्रपट पाहून सोलापुरातील सोहम शाम येमूल याने बोलक्या बाहुल्यांचा खेळ हा कलाप्रकार शिकला पाहिजे असं ठरवलं आणि बोलक्या बाहुल्यांची कला अवगत केली. दमाणी शाळेत इयत्ता सहावीमध्ये शिकणार्‍या सोहमचे वक्तृत्व, त्याची मिमिक्री आणि त्याचा हा बोलक्या बाहुल्यांचा खेळ कौतुकाचा विषय बनला आहे.

सोहम येमूल शहरातील दमानी विद्या मंदिर या शाळेत इयत्ता सहावी मध्ये शिकत आहे. सोहमचे वडील हे संगणक अभियंते आहेत. वडिलांनी सोहमची कला ओळखूनच  सोहमच्या कलेला वाव दिला आहे. बुक पपेट म्हणजेच बोलणारे पुस्तक, बोलणारा केक म्हणजेच केक पेपट, बोलणारा छोटूसिंग पपेट, डायनासोर पपेट, तात्या विंचू पपेट आदी बाहुले सध्या सोहमकडे आहेत.

Solapur : हैदराबादी मिरचीचे स्पेशल आंध्र भजी, एकदा खाल तर पुन्हा मागाल, Video

कशी झाली सुरूवात?

सुरुवातीला सोहमचे वडील श्याम येमूल यांनी सोहमला छोटूसिंग नावाचा छोटा बाहुला तयार करून दिला. हळूहळू सोहम यातील सर्व तांत्रिक गोष्टी युट्युबवर किंवा इतर ठी काणी पाहून शिकू लागला.1 जुलै 2019 रोजी भारतातील सर्वात लहान वयाचा पपेट सादर करणारा कलाकार म्हणून इंडिया रेकॉर्ड या संस्थेच्या वतीने सोहमची नोंद करण्यात आली.

सोहम सध्या या कलेतील पुढचा टप्पा शिकतोय. त्यासाठी तो विशिष्ट प्रकारचा योगा करतो. आवाजाचे उच्चार स्पष्ट यावेत यासाठी दोन ओठांच्या मध्ये कागद ठेवून बोलण्याचा सराव सध्या चालू आहे, असं सोहम सांगतो.

लहानपणापासूनच सोहमला या पपेट कलेची आवड होती. मी स्वतः त्याला अनेक छोटे-मोठे बाहुले बनवून दिले आहेत. आपल्या मुलाची आवड आपणच लक्षात घेऊन त्याला लहानपणापासूनच त्या गोष्टी शिकवल्या तर आपला मुलगा नक्कीच यशस्वी होऊ शकतो, असं सोहमचे वडील शाम येमूल सांगतात.

Rolling Stone च्या प्ले लिस्टमध्ये झळकला सोलापूरचा 'गली बॉय', पाहा Video

सोहमने पपेट कलेच्या माध्यमातून सादर केलेले विषय

छोटू बालकामगार ,गांधीजी कठपुतलीमावळा कठपुतली बुक/ केक पपेट, नरेंद्र मोदी पपेटछोटू/ सोनुली पपेट डोरेमॉनसुरेखा सोलापूरकर, कुल बर्ड पपेट, भगतसिंग एक समाजवादी क्रांतीकारक या विषयांवर सोहमने कला सादर केली आहे. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर फिलिपिन्सच्या टि एन एस वर भारतीय पपेटीयर म्हणून सोहम येमुल याची मुलाखात झाली होती. सोहमने आजवर प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून कोरोना काळात ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात विविध ठिकाणी एकूण 40  प्रयोग केले. त्यापैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण तो आपल्या पपेटकलातून सादर करतो. त्याच्या याच भाषणाच्या प्रयोगाला प्रेक्षकांकडून सर्वात जास्त दाद मिळते.

First published:

Tags: Local18, Solapur